भगवान बाहुबलींचे १५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:54 AM2018-02-21T05:54:46+5:302018-02-21T05:54:59+5:30

येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवात ७ फेब्रुवारीपासून आजअखेर तब्बल १५ लाख भाविकांनी हजेरी लावली.

Thousands of devotees of Lord Bahubali took the view | भगवान बाहुबलींचे १५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

भगवान बाहुबलींचे १५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

googlenewsNext

शीतल पाटील
श्रवणबेळगोळ : येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवात ७ फेब्रुवारीपासून आजअखेर तब्बल १५ लाख भाविकांनी हजेरी लावली. मुख्य मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांसह राजकीय नेते, लोकप्रतिनिधींची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी चौथ्या दिवशी १००८ कलशांनी बाहुबलींच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला.
चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा महोत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सुरुवातीला पंचकल्याण विधी पार पडला. या वेळी ८ ते ९ लाख भाविक सहभागी झाले होते. मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कोलकाता, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांतून भाविक बाहुबलींच्या दर्शनाला येत आहेत. आतापर्यंत १५ लाख लोकांनी सोहळ्याला उपस्थिती लावल्याचे महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी सांगितले. रविवार, सोमवारी सलग सुटीमुळे लक्षणीय गर्दी झाली होती. विंध्यगिरी पर्वतासोबतच चंद्रगिरी पर्वतावरही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. चंद्रगिरीवरून मस्तकाभिषेक पाहण्याची सोय केली आहे. तेथे येणाºया लोकांना लिंबू-सरबताचे वाटप केले जात आहे. चंद्रगिरीवर चिन्मयसागर महाराज (जंगलवाले बाबा) यांचे प्रवचन होत आहे.

Web Title: Thousands of devotees of Lord Bahubali took the view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.