हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, नोएडात कलम १४४ लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 02:25 PM2024-02-08T14:25:54+5:302024-02-08T14:30:02+5:30
नोएडा प्राधिकरणाविरोधात जवळपास 60 दिवसांपासून शेतकरी संपावर बसलेले होते.
नवी दिल्ली: नोएडा प्राधिकरणाच्या गेटवर नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-नोएडा, चिल्ला सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नोएडा आणि ग्रेनोमध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे.
#WATCH | UP farmers march towards Parliament from Delhi-Noida Chilla border over their various demands including hiked compensation pic.twitter.com/k6A0DzDjW6
— ANI (@ANI) February 8, 2024
नोएडा प्राधिकरणाविरोधात जवळपास 60 दिवसांपासून शेतकरी संपावर बसलेले होते. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ली-नोएडा चिल्ला सीमेवरून संसदेकडे मोर्चा काढला आहे. नोएडा ते दिल्लीचा मार्ग शेतकऱ्यांनी रोखला आहे. महामाया उड्डाणपुलाखाली हजारो शेतकरी जमले. हजारो शेतकरी दिल्लीला जाण्याच्या प्रयत्नात आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नोएडा आणि दिल्लीतील अनेक मार्गांवर वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
डीआयजी, ऍड. सीपी (एल अँड ओ), शिवहरी मीणा म्हणाले, 'कलम 144 लागू करण्यात आले आहे आणि सर्व सीमा 24 तासांसाठी सील करण्यात आल्या आहेत. सर्व सीमेवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे.आम्ही शेतकऱ्यांशी बोलत आहोत, सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. नोएडातील उद्योग मार्गाव्यतिरिक्त, रजनीगंधा ते सेक्टर-15 मेट्रो स्टेशन, चिल्ला ते सेक्टर-15 मेट्रो स्टेशन, न्यू अशोक नगर, उद्योग मार्ग यासह इतर मार्गांवर काही काळ वाहतूक वळवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
#WATCH | Noida: DIG, Addl. CP (L&O), Shivhari Meena says, "Section 144 has been imposed & all the borders have been sealed for 24 hours. Heavy security deployment at all the borders. Arrangements have been made so that the people do not face any trouble. Security has been… pic.twitter.com/L1W9ArPtP3
— ANI (@ANI) February 8, 2024