‘आधार’चे हजार आॅपरेटर बडतर्फ
By Admin | Published: April 10, 2017 01:07 AM2017-04-10T01:07:32+5:302017-04-10T01:07:32+5:30
युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरीटी आॅफ इंडिया (युआयडीएआय) ने आधार कार्ड तयार करणाऱ्या
नवी दिल्ली : युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरीटी आॅफ इंडिया (युआयडीएआय) ने आधार कार्ड तयार करणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. इतकेच नव्हे तर या सर्वांवर १0 हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे.
आधार कार्ड तयार करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. तरीही या आॅपरेटर्सनी अवाजवी फी आकारल्याचा आरोप आहे. आधार कार्डबाबत सरकार आग्रही असतांना विविध ठिकाणाहून या तक्रारी प्राप्त झाल्याने युआयडीएआयने ही धडक कारवाई केली. या संदर्भात बोलतांना युआयडीएआयचे सीईओ अजयभूषण पांडे म्हणाले, आधार कार्ड बाबत कोणी कोणतीही हेराफेरी केली तर अजिबात खपवून न घेण्याचे े आमच्या विभागाचे धोरण आहे. डिसेंबर २0१६ पासून आजतागायत आम्ही १ हजार असे आॅपरेटर्स शोधून काढले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून आमच्या व्यवस्थेतून त्यांना आम्ही हद्दपार करून टाकले. (विशेष प्रतिनिधी)
अधिक पैसे घेतात
पूर्वीच्या आधारची माहिती अपडेट करण्यास युआयडीएआयने २५ रूपये फी निश्चित केली. तथापि काही आॅपरेटर्स यासाठी अधिक पैसे आकारीत असल्याच्या तक्रारी युआयडीएआयकडे पोहोचल्या.