चीनच्या सीमेवरील दुर्गम भागात अडकले हजारो नागरिक, १०० दिवसांपासून रस्ता बंद, अन्नटंचाईचं संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:04 PM2021-09-28T14:04:23+5:302021-09-28T14:05:08+5:30

India-China Border News: चीनच्या सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील दोन दुर्गम खोऱ्यांचा अन्य जगाशी असलेला संपर्क तुटून १०० दिवस झाले आहेत. बॉर्डरची लाइफ लाइन बंद झाल्याने येथील हजारो लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

Thousands stranded on remote border with China, 100 days off road, food crisis | चीनच्या सीमेवरील दुर्गम भागात अडकले हजारो नागरिक, १०० दिवसांपासून रस्ता बंद, अन्नटंचाईचं संकट

चीनच्या सीमेवरील दुर्गम भागात अडकले हजारो नागरिक, १०० दिवसांपासून रस्ता बंद, अन्नटंचाईचं संकट

Next

नवी दिल्ली - चीनच्या सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील दोन दुर्गम खोऱ्यांचा अन्य जगाशी असलेला संपर्क तुटून १०० दिवस झाले आहेत. बॉर्डरची लाइफ लाइन बंद झाल्याने येथील हजारो लोकांचे जगणे कठीण झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून रस्ते मार्गाने होणारा संपर्क बंद झाल्याने या भागामध्ये दैनंदिन गोष्टींबाबत संकट निर्माण झाले आहे. येथील रस्ते वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. गेल्या १०० दिवसांमध्ये मिळून केवळ ८ किमी मार्गच क्लिअर झाला आहे. (Thousands stranded on remote border with China, 100 days off road, food crisis)

१६ जून रोजी आलेल्या अस्मानी संटकामुळे दारमा आणि चौंदास खोऱ्याला जोडणारा मार्ग पूर्णपणे खराब झाला होता. बॉर्डरवरील या महत्त्वाच्या रस्त्यावर एक नाही तर डझनभर ठिकाणी भूस्थलन झाले आहे. परिस्थिती अशी आहे की, ७० किमीच्या या मार्गावरील केवळ ८ किमीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावरील अनेक बॅली ब्रिज जमीनदोस्त झाले आहेत. अशीच परिस्थिती ब्यास खोऱ्यामध्ये आहे. ब्यास खोऱ्यामधूनच लिपुलेख खिंडीपर्यंत रोड जातो. मात्र थोड्याशा पावसामध्येही हा रस्ता जागोजागी बंद पडत आहे. बॉर्डरवरील व्यास, दारमा आणि चौंदास खोरे सामरिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून बॉर्डरवर संरक्षण दलसुद्धा पोहोचते.

स्थानिक आमदार हरीश धामी यांनी सांगितले की, या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे काम खूपच दुय्यम दर्जाचे झाले आहे. बीआरओच्या खराब कार्यप्रणालीमुळे हजारोंच्या लोकसंख्येवर संकटाची टांगती लवार आहे. अशा परिस्थितीत हे रस्ते बीआरओच्या अखत्यारीतून काढून घ्यावे. बीआरओ, पीडब्ल्यूडी आणि सीपीडब्ल्यूडी यांनी रस्त्यावर डझनभराहून अधिक मशीन तैनात केल्या आहेत. मात्र या मशिन आणि दीडशेहून अधिक कामगार कमी पडत आहेत. आता गावांमधील नागरिकांकडील दैनंदिन वापराच्या वस्तू जवळपास संपुष्टात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गावांमधील दुकानांमध्ये जे काही सामान उरले आहे त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

सरकारने बॉर्डरवरील या तीन खोऱ्यांसाटी एक हेलिकॉप्टर दिले आहे. त्याच्यामाध्यमातून ग्रामस्थ धारचुला येथून काही वस्तू मागवत आहेत. मात्र हजारोंच्या लोकसंख्येसाठी ते अपुरे आहेत. डीएम आशिष चौहान यांचे म्हणणे आहे की, रस्ते उघडण्यासाठी तिन्ही कार्यदायी संस्था काम करत आहेत. मात्र विषम भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे अडचणी येत आहेत. यावर्षाच्या पावसामुळे बॉर्डर भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

Web Title: Thousands stranded on remote border with China, 100 days off road, food crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत