औषध कंपन्यांकडून हजारो कोटींची करचोरी

By admin | Published: March 7, 2017 03:45 AM2017-03-07T03:45:33+5:302017-03-07T03:45:33+5:30

मोदी सरकारने नियंत्रण आणण्यास सुरुवात केलेली असली तरी औषध निर्मात्या कंपन्या हजारो कोटी रुपयांची करचोरी करीत आहेत

Thousands of tax fraud by drug companies | औषध कंपन्यांकडून हजारो कोटींची करचोरी

औषध कंपन्यांकडून हजारो कोटींची करचोरी

Next

नितीन अग्रवाल,
नवी दिल्ली- औषधांच्या अव्वाच्या सव्वा किमतीवर मोदी सरकारने नियंत्रण आणण्यास सुरुवात केलेली असली तरी औषध निर्मात्या कंपन्या हजारो कोटी रुपयांची करचोरी करीत आहेत. या कंपन्या सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सरकारकडे जमा करण्यात बरीच गडबड करीत आहेत. सरकार आता अशा कंपन्यांभोवती फास आवळायला सुरुवात करीत आहे.
अर्थ मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औषध निर्मात्या कंपन्यांतील हिशेब पुस्तकातील करचोऱ्या उघडकीस आल्या असून त्या पकडल्या गेल्या आहेत. गेल्या चार वर्षांत उत्पादन शुल्कात १७,३५८ कोटी रुपयांचा घोटाळा केलेली ८२६८ प्रकरणे उघडकीस आली. यातील ६,१२३ प्रकरणांत सुमारे २५४० कोटी रुपये वसूल झाले आहेत. याच प्रकारे सेवा करात घोटाळे केल्याची २७९२४ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ५२,३८८ कोटी रुपयांची कर अनियमितता होती. यात १६,५४३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
उत्पादन शुल्कातील अनियमिततेची सगळ््यात जास्त २६०६ प्रकरणे २०१३-२०१४ वर्षात पकडली गेली. त्याच वर्षी सेवा करातील अनियमिततेची सगळ््यात जास्त घटनांची (९२१५) माहिती समजली. तथापि, रकमेच्या बाबतीत विचार केला तर उत्पादन शुल्कचे ५२९७ कोटी रुपये आणि सेवा कराचे १८,९७० कोटी रुपयांचे सगळ््यात जास्त घोटाळे २०१५-२०१६ या वर्षात उघडकीस आले. सूत्रांच्या अनुमानानुसार सरकारने करचोरी करणाऱ्या कंपन्यांकडून प्रत्येक रुपया वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे. सरकारकडून या कंपन्यांना नोटीस पाठवणे सुरू झालेले आहे व कठोर कायदेशीर कारवाईदेखील केली जात आहे. योग्य तो कर जमा न करणाऱ्या कंपन्यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला जाईल, असे सांगितले जात आहे.
सेवा कर जमा करण्यात ५२,३८८ कोटी रुपयांचा घोटाळा
उत्पादन शुल्कात १७,३५८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार
२०१३-२०१४ वर्षात अनियमिततेची सगळ्यात
जास्त प्रकरणे
२०१५-२०१६ मध्ये सगळ्यात मोठ्या रकमेच्या अनियमितता
>आॅक्टोबर २०१६ पर्यंत
>उत्पादन शुल्क
2990 कोटींचा घोटाळा
1173 प्रकरणे उघडकीस
>सेवा कर
9031 कोटींचा घोटाळा
4456 प्रकरणे उघडकीस
>७८२ प्रकरणात ३७७ कोटी रुपये आणि सेवा कराच्या ४३२ प्रकरणात २३३४ कोटी रुपये वसूल

Web Title: Thousands of tax fraud by drug companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.