भगवानगडावर पंकजा मुडे यांच्या समर्थनार्थ जाणार हजारो वंजारी बांधव
By admin | Published: October 8, 2016 11:51 PM2016-10-08T23:51:04+5:302016-10-08T23:51:04+5:30
जळगाव : पाथर्डी तालुक्यातील जि.नगर भगवान गडावर दसरा मेळाव्यानिमित्त राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मंुडे यांच्या समर्थनार्थ जिल्ातून हजारो वंजारी बांधव जातील. १० रोजी रात्री जामनेर, जळगाव, पाचोरा व इतर भागातून वंजारी समाजबांधव गडाकडे रवाना होतील, असा निर्णय शनिवारी दुपारी लाडवंजारी सभागृहात झालेल्या बैठकीत झाला.
Next
ज गाव : पाथर्डी तालुक्यातील जि.नगर भगवान गडावर दसरा मेळाव्यानिमित्त राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मंुडे यांच्या समर्थनार्थ जिल्ातून हजारो वंजारी बांधव जातील. १० रोजी रात्री जामनेर, जळगाव, पाचोरा व इतर भागातून वंजारी समाजबांधव गडाकडे रवाना होतील, असा निर्णय शनिवारी दुपारी लाडवंजारी सभागृहात झालेल्या बैठकीत झाला. समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत वंजारी समाजातील पोटजात असलेल्या लाडवंजारी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासंबंधी कृती समितीही गठीत करण्यात आली. राजेंद्र घुगेपाटील हे या समितीचे प्रमुख आहे. बैठकीला समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घुगेपाटील, सुकदेव सानप, रमेश लाडवंजारी, सोमनाथ पाटील, प्रशांत नाईक, शरद घुगे, भरत पाटील, किशोर पाटील, नामदेव नाईक, भानुदास नाईक, ज्ञानेश्वर नाईक, दिनेश घुगे, योगेश सानप आदी उपस्थित होते. नामदेव शास्त्रींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्हभगवान गडावर गोपीनाथ मुंडे हे अनेक वर्षे दसरा मेळावा घेत होते. सामाजिक मंत्र, एकीचा मंत्र ते द्यायचे. ही परंपरा म्हणून मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा मागील वर्षी घेतला. परंतु यंदा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासंबंधी विरोध केला आहे. हा विरोध ते कुठल्यातरी राजकीय दबावामुळे करीत आहे. शास्त्री यांच्या भूमिकेबाबत बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच यंदाही दसरा मेळावा व्हावा यासाठी पंकजा मुंडे यांना समर्थन देण्याचा निर्णयही झाला.