घटस्फोटाची धमकी देणे हे पतीविरुद्धचे ‘क्रूर कृत्य’

By Admin | Published: February 23, 2016 01:24 AM2016-02-23T01:24:39+5:302016-02-23T01:24:39+5:30

घटस्फोटाची धमकी देणारे एक साधे पत्रदेखील ‘क्रूर कृत्य’ ठरते, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी एका इसमाला त्याच्या विभक्त पत्नीपासून घटस्फोट घेण्याची परवानगी दिली.

The threat of divorce is a 'cruel act' against a husband | घटस्फोटाची धमकी देणे हे पतीविरुद्धचे ‘क्रूर कृत्य’

घटस्फोटाची धमकी देणे हे पतीविरुद्धचे ‘क्रूर कृत्य’

googlenewsNext

नवी दिल्ली : घटस्फोटाची धमकी देणारे एक साधे पत्रदेखील ‘क्रूर कृत्य’ ठरते, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी एका इसमाला त्याच्या विभक्त पत्नीपासून घटस्फोट घेण्याची परवानगी दिली.
हा इसम मागील २८ वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहात आहे. १९८० मध्ये त्याचा विवाह झाला होता. १९८७ मध्ये पत्नी व चार वर्षांच्या कन्येला भारतात सोडून तो अमेरिकेला निघून गेला होता. १९९० मध्ये त्याला पत्नीने पाठविलेले एक पत्र प्राप्त झाले. ‘आपला जुना मित्र आपल्याला मिळाला आहे आणि तो माझ्या अल्पवयीन मुलीसह माझा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास तयार आहे. त्यामुळे आपण आता घटस्फोट घ्यायला पाहिजे,’ असे पत्नीने या पत्रात लिहिले होते.
१९९५ मध्ये हे प्रकरण न्यायालयासमक्ष आले तेव्हा या पत्रातील मजकूर असत्य होता आणि आपण खोटे बोलल्याची आणि आपल्या पतीसोबत विदेशात किंवा भारतात कुठेही नांदण्यास तयार असल्याची कबुली पत्नीने दिली होती. तथापि दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. नाजमी वझिरी यांनी पत्नीचे ते धमकी पत्र क्रूर कृत्य असल्याचे आणि या पत्रामुळे पतीला ४-५ वर्षेपर्यंत प्रचंड मानसिक वेदना सहन कराव्या लागल्याचे स्पष्ट केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. क्रौर्याच्या आधारावर हा विवाह मोडण्याचा कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय उचलून धरताना न्या. वाझिरी म्हणाल्या, ‘१९८७ पासून पत्नीपासून वेगळे राहणाऱ्या पतीला त्याच्या पत्नीने; आपण घटस्फोट घेऊन पुनर्विवाह करणार असल्याचे नमूद करणारे पत्र मिळाले होते.

Web Title: The threat of divorce is a 'cruel act' against a husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.