इसिस आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांपासून धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2015 02:43 AM2015-12-27T02:43:56+5:302015-12-27T02:43:56+5:30

इस्लामिक स्टेट्स (इसिस) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) यांसारख्या दहशतवादी संघटनांपासून नव्याने निर्माण झालेल्या धोक्यापासून सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय गृह मंत्रालय

The threat from organizations like ISIS and Lashkar-e-Toiba | इसिस आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांपासून धोका

इसिस आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांपासून धोका

Next

- नबिन सिन्हा,  नवी दिल्ली
इस्लामिक स्टेट्स (इसिस) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) यांसारख्या दहशतवादी संघटनांपासून नव्याने निर्माण झालेल्या धोक्यापासून सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय गृह मंत्रालय आणि इंटेलिजन्स ब्युरो व राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) अन्य गुप्तचर संस्थांनी सर्व राज्यांना दिलेला आहे.
इसिसमध्ये सामील होण्याची इच्छा असलेल्या तीन युवकांना शनिवारी नागपूर विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर गुप्तचर संस्थांनी महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, झारखंड, केरळ आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांना नव्याने हा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
इसिस आणि एलईटी या दोन्ही संघटना आपली फळी मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय युवकांना लक्ष्य बनवित आहेत आणि अशी भाडोत्री माणसं मिळविण्यासाठी भारत हे सोपे लक्ष्य आहे, असे मत गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केले.
इसिस आणि एलईटी यांना इंडियन मुजाहिदीनसारख्या (आयएम) संघटना मदत करीत आहेत. दिल्ली, अहमदाबाद, मुंबईसारखी प्रमुख शहरे आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अन्य काही शहरांवर तसेच राजकीय नेत्यांवर हल्ले करण्याची या दहशतवादी गटांची योजना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नुकत्याच घडून आलेल्या भारत-पाक चर्चेमुळे या गटांना मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळेच हे गट आता चर्चेची ही प्रक्रिया बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहेत, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पोलीस महासंचालकांच्या बैठकीतही या मुद्यावर व्यापक चर्चा करण्यात आली होती. गुप्तचर माहितीचे आदानप्रदान करणे आणि दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने सर्व राज्यांमध्ये समर्पित एटीएस माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रयत्नांमुळेच अलीकडच्या काळात इसिस वा अन्य दहशतवादी संघटनांकडे आकर्षित झालेल्या १० ते १५ युवकांना स्थानबद्ध करण्यात आले, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: The threat from organizations like ISIS and Lashkar-e-Toiba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.