तुमच्या 'आधार'ची सुरक्षा धोक्यातच, हकपोस्ट इंडियाने केला दावा, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 08:20 PM2018-09-11T20:20:04+5:302018-09-11T20:25:29+5:30
हफपोस्ट इंडिया या माध्यम संस्थेने हा अहवाला प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, कोणीही अनाधिकृतव्यक्ती केवळ 2500 रुपयांत मिळणाऱ्या या सॉफ्टवेअरद्वारे जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून आधारचा आयडी तयार करु शकतो
नवी दिल्ली - आधार कार्डच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधारच्या डेटाबेसमध्ये एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आधार डेटाबेस हॅक होत असल्याचा अहवाल एका माध्यमाने दिला आहे. त्यासाठी 3 महिन्यांपासून या माध्यमसंस्थेने संशोधन केले होते. या सॉप्टवेअरमधील सिक्युरिटी फिचर बंद करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.
हफपोस्ट इंडिया या माध्यम संस्थेने हा अहवाला प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, कोणीही अनाधिकृतव्यक्ती केवळ 2500 रुपयांत मिळणाऱ्या या सॉफ्टवेअरद्वारे जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून आधारचा आयडी तयार करु शकतो. सध्या, आधार डेटाबेसमध्ये 1 कोटीपेक्षा अधिक लोकांची खासगी माहिती आणि बायोमेट्रिक्स डिटेल्स आहेत. विशेष म्हणजे अशा नंबर्संचा सध्या वापर होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, सरकारकडून नागरिकांच्या ओळखपत्रासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या बातमीनंतर आधार कार्डच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
हकपोस्ट इंडियाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीन आणि दोन भारतीय तज्ञांकडून सॉफ्टवेअरमधील एका महत्वाच्या कोडचे (पॅच) संशोधन केले. त्यामधील एका भारतीय तज्ञाने आपली ओळख जाहीर न करण्याची अट ठेवली आहे. कारण, ते सध्या एका सरकारी विश्वविद्यालयात नोकरी करत आहेत. या तज्ञांच्या अहवालानुसार युजर्स महत्वपूर्ण सुरक्षा फिचर्स हॅक करु शकतात. ज्याद्वारे बेकायदेशीरपणे आधार नंबर जनरेट केला जाऊ शकतो. दरम्यान, आधार इंडिया म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडियाने हे वृत्त फेटाळले आहे. तसेच हे संशोधन निरर्थक असून आधार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
Unique Identification Authority of India dismisses a news report appearing in social & online media about Aadhaar Enrolment Software being allegedly hacked as completely incorrect and irresponsible. The claims lack substance and are baseless: UIDAI pic.twitter.com/1NAsWEZhih
— ANI (@ANI) September 11, 2018