धमकी देण्याचे प्रकार सुरूच, पुन्हा ६० विमानांना  बाॅम्बच्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:29 AM2024-10-29T05:29:07+5:302024-10-29T05:29:17+5:30

बॉम्बच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना काळजी घेण्यास सांगितले आहे.

Threats continue, bomb threats to 60 planes again | धमकी देण्याचे प्रकार सुरूच, पुन्हा ६० विमानांना  बाॅम्बच्या धमक्या

धमकी देण्याचे प्रकार सुरूच, पुन्हा ६० विमानांना  बाॅम्बच्या धमक्या

नवी दिल्ली : भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांना बॉम्बची धमकी देण्याचे प्रकार सुरूच आहेत. सोमवारी पुन्हा एकदा ६० विमानांना अशा धमक्या मिळाल्या. १५ दिवसांत ४१० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणाऱ्या विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.

बहुतांश धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. सूत्रांनी सांगितले की, सोमवारी एअर इंडिया आणि इंडिगोच्या प्रत्येकी २१ विमाने आणि विस्ताराच्या सुमारे २० विमानांना धमक्या मिळाल्या. बॉम्बच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना काळजी घेण्यास सांगितले आहे. अशी माहिती प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटविण्यास सांगण्यात आले आहे. 

Web Title: Threats continue, bomb threats to 60 planes again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान