नुपूर शर्मांसह तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, दिल्ली पोलिसांनी नोंदवला FIR
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 03:24 PM2022-06-06T15:24:24+5:302022-06-06T16:05:45+5:30
Nupur Sharma : 3 जून रोजी कानपूरमध्ये एका टीव्हीवर चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नुपूर यांनी केलेल्या टीकेनंतर वातावरण गढूळ झाले.
भाजप पक्षाच्या निलंबित (Suspension) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल IFSO युनिटने आज एफआयआर नोंदवला आहे. हा एफआयआर अज्ञात लोकांविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार नुपूर शर्माने (Nupur Sharma) दिल्ली पोलिसांकडे (Delhi Police) केली होती. याआधी काल नुपूर शर्माने ट्विट केले होते की, मी सर्व मीडिया हाऊसेस आणि इतर सर्वांना विनंती करते की, माझा पत्ता सार्वजनिक करू नका. माझ्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आहे.
नुपूरविरुद्ध महाराष्ट्रात अनेक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत
नुपूरने मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समुदाय तिच्यावर प्रचंड संतापला आहे. काल भाजपने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांना पक्षातून निलंबित केले. नुपूर शर्मा विरोधात महाराष्ट्रात अनेक एफआयआर दाखल आहेत. 3 जून रोजी कानपूरमध्ये एका टीव्हीवर चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नुपूर यांनी केलेल्या टीकेनंतर वातावरण गढूळ झाले.
I request all media houses and everybody else not to make my address public. There is a security threat to my family.
— Nupur Sharma (@NupurSharmaBJP) June 5, 2022
काय म्हणालं भाजप?
नुपूर शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात, भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक म्हणाले, "तुम्ही विविध विषयांवर पक्षाच्या भूमिकेबद्दल उलट मत व्यक्त केले आहे, जे पक्षाच्या घटनेच्या नियम 10(अ) चे स्पष्ट उल्लंघन आहे. हे निर्देश आहे. पुढील तपास प्रलंबित असल्याचे सांगण्यासाठी, तुम्हाला याद्वारे पक्षातून आणि तुमच्या जबाबदाऱ्या/कृतींमधून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
नुपूरने एक निवेदन जारी करून माफी मागितली आहे
मात्र, यानंतर नुपूर शर्माने ट्विटरवर एक वक्तव्य जारी करत मोहम्मद पैगंबर यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल माफी मागितली आहे. नूपुरने लिहिले की, “गेल्या अनेक दिवसांपासून मी टीव्हीवर चर्चेत सामील झाले होते, जिथे माझ्या आराध्य शिव जींचा दररोज अपमान केला जात होता. हे शिवलिंग नसून कारंजे आहे, असे माझ्यासमोर बोलले जात होते. दिल्लीच्या प्रत्येक फूटपाथवर अनेक शिवलिंगे पाहायला मिळतात. जा आणि पूजा करा. आपल्या महादेव शिव जींचा असा वारंवार माझ्यासमोर केलेला अपमान मला सहन झाला नाही आणि मी रागात काही गोष्टी बोललो. माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेते. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू कधीच नव्हता.