पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक, सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:45 IST2025-01-04T13:44:44+5:302025-01-04T13:45:12+5:30

छत्तीसगडमधील विजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मुकेश चंद्राकर यांची हत्या करून त्यांचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये लपवण्यात आला होता.

Three accused arrested in journalist Mukesh Chandrakar murder case, body found in septic tank | पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक, सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडला होता

पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक, सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडला होता

पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या करून त्यांचा मृतदेह छत्तीसगडमधील विजापूर येथील सेप्टिक टँकमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  'पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासासाठी विशेष पथक तयार केले आहे. ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या आवारातील सेप्टिक टँकमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येत आहे.

बुधवारी संध्याकाळी ते बेपत्ता झाले आणि त्यांचा मोठा भाऊ युकेश चंद्राकर याने दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मुकेशच्या मोबाईल नंबरचा मागोवा घेतला, दरम्यान सुकेश चंद्रकार याच्या वर्कशॉपजवळ ट्रॅक झाले, यावेळी  काँक्रीट स्लॅबने नव्याने ओतलेल्या सेप्टिक टाकीत मृतदेह सापडला. या हत्येचा संबंध जिल्ह्यातील रस्ते बांधणीच्या कामात झालेल्या अनियमिततेशी संबंधित असल्याचा संशय आहे. या कामात सुरेश चंद्राकर यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.

विजापूरसह बस्तर विभागात पत्रकारांनी सकाळी शहरातील राष्ट्रीय महामार्ग ३६ वरील हॉस्पिटल चौकात रास्ता रोको करून ठेकेदाराच्या मालमत्ता जप्त कराव्यात आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आंदोलक पत्रकारांनी केली विजापूरच्या पोलिस अधीक्षकांकडे मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास रविवारपासून बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

सध्या या घटनेतील संशयितांची चौकशी सुरू आहे. मुकेश हे देशभरातील नक्षल प्रकरणांवर पत्रकारितेतील प्रसिद्ध नाव होते.
ते १ जानेवारीपासून बेपत्ता होते. मात्र दोन दिवसांनंतर पत्रकार मुकेश यांचा मृतदेह ठेकेदाराच्या बांधकाम कंपनीत बांधलेल्या सेप्टिक टँकमध्ये आढळून आला.मुकेश यांनी काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराची बातमी दाखवली होती.

Web Title: Three accused arrested in journalist Mukesh Chandrakar murder case, body found in septic tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.