आत्मसमर्पणासाठी तीन आरोपींनी मागितला वेळ, बिल्किस बानोप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 06:40 AM2024-01-19T06:40:26+5:302024-01-19T06:40:46+5:30

सर्वोच्च न्यायालयाने ८ जानेवारी रोजी ११ दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता.

Three accused sought time for surrender, petition in Supreme Court in Bilkis Bano case | आत्मसमर्पणासाठी तीन आरोपींनी मागितला वेळ, बिल्किस बानोप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका

आत्मसमर्पणासाठी तीन आरोपींनी मागितला वेळ, बिल्किस बानोप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याप्रकरणातील तीन दोषींनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आत्मसमर्पण करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली.

सर्वोच्च न्यायालयाने ८ जानेवारी रोजी ११ दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. आत्मसमर्पणाची वेळ वाढवण्याची मागणी बाब न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना व संजय करोल यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी नमूद केली.

'खंडपीठाची पुनर्रचना करावी लागेल'
तीन याचिकाकर्त्यांकडून आत्मसमर्पण करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. खंडपीठाची पुनर्रचना करावी लागेल. त्यासाठी रजिस्ट्रीला सरन्यायाधीशांकडून आदेश मागावे लागतील, असे खंडपीठाने 
यावेळी सांगितले.

Web Title: Three accused sought time for surrender, petition in Supreme Court in Bilkis Bano case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.