'5 वर्षात भारताचे पाकिस्तानवर तीन एअर स्ट्राईक, तिसऱ्याची माहिती देणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 05:25 PM2019-03-09T17:25:38+5:302019-03-09T17:26:25+5:30
भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला.
मंगळुरू - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एअर स्ट्राईकसंदर्भात बोलताना भारताने तीन स्ट्राईक केल्याचं सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे बोलताना राजनाथसिंह यांनी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आतापर्यंत तीन स्ट्राईक केल्याचं म्हटलं. मात्र, मी तुम्हाला केवळ दोन स्ट्राईकबद्दल सांगणार असून तिसऱ्या स्ट्राईकबद्दल सांगणार नाही, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला. मात्र, मी तुम्हाला केवळ दोनच स्ट्राईकची माहिती देणार आहे. तुम्हाला तिसऱ्या स्ट्राईकची माहिती देणार नाही, असे म्हणत राजनाथसिंह यांनी तिसऱ्या स्ट्राईकची उत्कंठा वाढवली आहे. कारण, माहिती देताना राजनाथसिंह यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकचा हल्ला आणि पुलवामा हल्ल्यानंतरचा एअर स्ट्राईक याबाबत सांगितले. त्यामुळे तिसरा स्ट्राईक नेमका कोणता असा प्रश्न उपस्थितांना पडला असून आता देशातील जनतेलाही त्या तिसऱ्या स्ट्राईकबद्दल उत्कंठा लागून राहिली आहे.
आताचा भारत दुबळा राहिला नाही, सशक्त भारत आहे. त्यामुळेच, गेल्या 5 वर्षात भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना तीन स्ट्राईक केले. मात्र, राजनाथसिंह यांनी तिसऱ्या स्ट्राईकबाबत काहीही सांगणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण बनले आहे. तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण होताना दिसत आहे.
#WATCH Union Home Minister Rajnath Singh at a public rally in Mangaluru: Pichle 5 varsho mein, teen baar apni seema ke bahar jaa kar hum logon ne air strike kar kaamyaabi haasil ki hai. Do ki jaankari apko dunga, teesri ki nahi dunga. #Karnatakapic.twitter.com/NZKeJPulrS
— ANI (@ANI) March 9, 2019