तीन वर्षात रस्ते अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू रस्ते बनले मृत्यूचे सापळे : अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात

By Admin | Published: January 14, 2017 12:06 AM2017-01-14T00:06:24+5:302017-01-14T00:06:24+5:30

अरुण वाघमोडे

Three-and-a-half thousand road accidents in road accidents in three years: Deaths: Most Accidents on Internal Roads | तीन वर्षात रस्ते अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू रस्ते बनले मृत्यूचे सापळे : अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात

तीन वर्षात रस्ते अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू रस्ते बनले मृत्यूचे सापळे : अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात

googlenewsNext
ुण वाघमोडे
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ हजार २५५ अपघात झाले असून, यामध्ये २ हजार ४७७ जणांचा मृत्यू झाला आहे़ २ हजार ८४५ जण गंभीर तर ७४७ किरकोळ जखमी झाले आहेत़ यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर १२४६, राज्य महामार्गावर २०८५ तर इतर रस्त्यांवर सर्वाधिक ३९२४ अपघात झाले असून, रस्ते प्रवासी आणि पादचार्‍यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत़
रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानाच्या निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या अहवालात अपघातांची आकडेवारी देण्यात आली आलेली आहे़ २०१४ ते २०१६ या कालावधीत अपघातांची संख्या आणि मयतांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेले दिसत नाही़ उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक विभागाच्यावतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान राबविण्यात येत असले तरी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अपघातांमध्ये मरणारांचा आलेख वाढतच आहे़
जिल्ह्यातून कल्याण विशाखापट्टणम तर संगमनेर नाशिक-पुणे हे राष्ट्रीय तर नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-सोलापूर हे राज्य महामार्ग जातात़ या महामार्गांवर असणार्‍या अपघातस्थळीच वारंवार अपघात होत आहेत़ गेल्या वर्षभरात नगर-पुणे महामार्गावर सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद आहे़ जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर साडेपाचशेपेक्षा जास्त धोकादायक ठिकाणे आहेत़ यामध्ये सूचना फलक नसणे, हायवेवरील दुभाजक फोडणे, गतिरोधक नसणे, सिग्नल नसणे, रस्त्यांमधील खड्डे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी कारणांमुळे हे अपघात होत आहेत़ राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापेक्षा जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांत अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात होऊन ९३१ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये खराब रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे हिच कारणे समोर येत आहेत़
-------------------------------
अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या
२०१४-
अपघातमयत जखमी
१८५२ ८०६ १३७०

२०१५-
अपघातमयत जखमी
१७४३ ८४४ १०९८

२०१६-
अपघातमयत जखमी
१६६० ८२७ १०६०
---------------------------------
तीन वर्षात मार्गनिहाय अपघात
मार्ग अपघात
राष्ट्रीय १२४४
राज्य २०८५
इतर रस्ते ३९२४
--------------------------
अपूर्ण़़़़़़़़







Web Title: Three-and-a-half thousand road accidents in road accidents in three years: Deaths: Most Accidents on Internal Roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.