महामार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकली विचित्र अपघात : शासकीय आयटीआयजवळ घडली घटना
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:32+5:302016-04-26T00:16:32+5:30
जळगाव : महामार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.१६ वाजेच्या सुमारास शासकीय आयटीआयजवळ घडली. या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणताही गुन्हा अथवा नोंद करण्यात आलेली नव्हती.
Next
ज गाव : महामार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.१६ वाजेच्या सुमारास शासकीय आयटीआयजवळ घडली. या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणताही गुन्हा अथवा नोंद करण्यात आलेली नव्हती.प्राप्त माहितीनुसार, खोटेनगरकडून आकाशवाणी चौकाच्या दिशेने जाणार्या (एमएच १८ डब्ल्यू ७११७) क्रमांकाच्या कार चालकाने मू.जे. चौकापासून काही अंतरावर गतिरोधक येण्यापूर्वी कारचा वेग कमी केला. याच वेळी कारच्या मागून वेगात येत असलेल्या (एमएच १९ बीएम ४५७१) क्रमांकाच्या मालवाहू चारचाकी चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने तो कारवर मागून जाऊन धडकला. तर त्याच्या मागे चालणार्या दुसर्या (एमएच १५ सीके ४०६) क्रमांकाच्या चारचाकी चालकालाही दोन्ही वाहनात पुरेसे अंतर न ठेवता आल्याने ही चारचाकी पुढील चारचाकीवर जोरात जाऊन आदळली. या अपघातात सर्वात पुढे चालणार्या कारच्या मागील भागाचे तर सर्वात मागे चालणार्या चारचाकीचे बोनेट व रेडिएटरचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर तिन्ही वाहन चालकांनी एकमेकांशी हुज्जत घातल्याने तणाव निर्माण झाला. तिन्ही वाहनांमधील मधल्या वाहनातून बांधकामाच्या लोखंडी सळ्या वाहून नेल्या जात होत्या. सुदैवाने त्या पुढील कार किंवा मागील चारचाकी वाहनात घुसल्या नाहीत. नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.वाहतूक विस्कळीत...या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करून वाहन चालकांमध्ये समझोता घडवून आणला. घटनास्थळी नागरिकांनीदेखील गर्दी केली होती.