संजय जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने तीन केंद्रीय मंत्री अडचणीत
By admin | Published: April 15, 2015 04:49 PM2015-04-15T16:49:37+5:302015-04-15T16:49:37+5:30
सहा एप्रिल रोजी भाजपाचे माजी नेते संजय जोशी यांचा वाढदिवस होता. यावेळी भाजपा मंत्र्यांनी जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - भाजपाचे माजी नेते संजय जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने भाजपाचे तीन मंत्री अडचणीत आले आहेत.
सहा एप्रिल रोजी भाजपाचे माजी नेते संजय जोशी यांचा वाढदिवस होता. यावेळी भाजपा मंत्र्यांनी जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते. या प्रकरणी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनवाल व कृषी राज्यमंत्री संजीव बालियान यांना भाजपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर नाईक यांचे सहकारी नितीन सरदारे यांच्याकडून पक्षाने राजीनामा घेतला आहे.
अमित शहा यांनी दुरध्वनीवरून नाईक यांना फटकारले तसेच इतर ३४ जणांवर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
याबाबत बालियन यांना विचारले असता जोशी यांच्या वाढदिवसाबद्दल आपल्याला काही माहित नसून पक्षाकडून कोणतीही नोटीस आली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात खासदार मनोज तिवारी यांचे नाव घेण्यात येत आहे. सरदारे यांनी इतर काही कारणांनी राजीनामा दिला असून ते पक्षातच काम करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. जोशी हे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य होते. पंतप्रधान मोदी गुजरातेचे मुख्यमंत्री असताना जोशी यांच्यासोबत मतभेद झाल्याने जोशींना राजीनामा द्यावा लागला होता.