विद्यार्थिनीसह तिघांचा मृत्यू

By admin | Published: August 2, 2015 11:31 PM2015-08-02T23:31:41+5:302015-08-02T23:31:41+5:30

विद्यार्थिनीसह तिघांचा मृत्यू

Three deaths with a student | विद्यार्थिनीसह तिघांचा मृत्यू

विद्यार्थिनीसह तिघांचा मृत्यू

Next
द्यार्थिनीसह तिघांचा मृत्यू
नागपूर :
रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला. एमआयडीसी येथील १९ वर्षीय प्रीती मंगेश मेश्राम ही नर्सिंगची विद्यार्थिनी होती. तिचे आईवडील जनरल स्टोअर्स चालवितात. रविवारी सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास प्रीती जनरल स्टोअर्समध्ये विकण्यासाठी दूध आणण्यासाठी ॲक्टीव्हाने जात होती. ती सुमंगल विहार येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बसला धडकली. यात तिच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने ती जखमी झाली. तब्बल तासाभरानंतर रस्त्यावरून जात असलेल्या लोकांचे तिच्यावर लक्ष गेले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु तेव्हापर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्याचप्रकारे भाग्यश्रीनगर नंदनवन येतील ७१ वर्षीय श्रीहरी साळवे हे १८ जुलै रोजी रात्री पायी जात होते. एका बाईक चालकाने त्यांना धडक दिल्याने ते जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिसरी घटना काटोल रोडवर घडली. न्यू इंदोरा येथील ३७ वर्षीय उप्ींेद्र पानतावणे २६ जुलै रोजी काटोल रोडने जात असतांना अपघात होऊन जखमी झाले. मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर :
दहावीच्या एका विद्यार्थिनीने गफळास घेऊन आत्महत्या केली. स्वीटी राजेंद्र वानखेडे (१५) रा. गोपालनगर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दहावीची विद्यार्थिनी होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
चोरी करतांना सापडली अण्णा गँग
नागपूर :
चोरी करणाऱ्या अण्णा गँगच्या दोन सदस्यांना नागरिकांनी रंगेहात पकडले. रामचंद्रन ऊर्फ रामू (४०) रा. काजीपेठ आंध्रप्रदेश आणि जयेश सेलवा कुमार जानकी रामन (३६) रा. त्रिचापल्ली तामिळनाडू असे आरोपीचे नाव आहे.
इंदोर येथील प्रदीप अग्रवाल शनिवारी रात्री मानस चौक येथील ट्रॅव्हल्स कार्यालयात पोहोचले. दरम्यान दोन्ही आरोपी बॅग घेऊन पळत होते. अग्रवाल यांनी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Three deaths with a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.