हुगळी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, तर 40 जण बेपत्ता
By admin | Published: April 26, 2017 03:54 PM2017-04-26T15:54:54+5:302017-04-26T15:54:54+5:30
पश्चिम बंगालमध्ये हुगळी नदीत एक जेट्टी कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 26 - पश्चिम बंगालमध्ये हुगळी नदीत एक जेट्टी कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरतीच्या वेळी समुद्राला उधाण आलं असताना ही जेट्टी कोसळण्याची दुर्घटना झाली आहे. जेट्टीवर उभे असलेले जवळपास 200 प्रवासी नदीत पडले, मात्र त्यातील 40 जण अद्याप बेपत्ता आहेत.
नदीत बुडालेल्या प्रवाशांचा शोधकार्य सुरू आहे. आपत्कालीन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, बेपत्ता असलेल्या प्रवाशांसाठी शोधकार्य राबवलं जात आहे. जेट्टी आधीच कमकुवत झाली असल्यानं ऐन भरतीच्यावेळी ती कोसळली, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये नुकसानभरपाई, तर जखमींना 25 लाख देण्याची घोषणा केली आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनही राबवण्यात आलं आहे.