तीन तलाकची प्रथा अयोग्य! उपराष्ट्रपतींच्या पत्नींनी केला विरोध
By admin | Published: April 8, 2017 09:24 PM2017-04-08T21:24:52+5:302017-04-08T21:36:31+5:30
उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांची पत्नी सलमा यांनीही तीन तलाकच्या प्रथेला विरोध केला आहे. कुराणामध्ये तीन तलाकबाबत
Next
ऑनलाइन लोकमत
अलिगड, दि. 8 - मुस्लिम धर्माच्या अनुयायांमधील तीन तलाकच्या प्रथेविरोधात गेल्या काही काळापासून वातावरणनिर्मिती होत आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांची पत्नी सलमा यांनीही तीन तलाकच्या प्रथेला विरोध केला आहे. कुराणामध्ये तीन तलाकबाबत काहीही उल्लेख नाही. केवळ तलाक तलाक तलाक म्हटल्याने तलाक होत नाही, सलमा यांनी म्हटले आहे.
चाचा नेहरू मदरसा येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या सलमा अंसारी यांनी तीन तलाकबाबत प्रसारमाध्यमांसमोर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी महिलांना कुराण वाचून त्यातील अर्थ समजून घेण्यास सांगितले. ज्यामुळे मौलाना त्यांना चुकीचा अर्थ सांगून फसवू शकणार नाहीत. त्या म्हणाल्या, "कुराण वाचले असेल तर याबाबतचे उत्तर नक्कीच मिळेल. कुराणामध्ये तीन तलाकबाबत काहीही उल्लेख नाही. ज्यांनी कुराण वाचले नाही, त्यांना याबाबत काहीच माहीत नाही. तसेच तुम्ही अरबी भाषेतील कुराण वाचले आहे की त्याचे भाषांतर वाचले आहे, याचाही विचार करावा लागेल. बरेच जण मौलाना, मुल्ला यांनी सांगितलेलाच अर्थ प्रमाण मानतात."
दरम्यान सलमा पुढे म्हणाल्या, "कुराण रस्ता दाखवणारा सर्वात मोठा मार्गदर्शक आहे. जर तुम्ही कुराण वाचले नाही तर तुम्हाला कुणीही फसवू शकेल. त्यामुळे महिलांनी कुराण वाचले पाहिजे, त्यावर विचार केला पाहिजे, असे माला वाटते." गेल्या काही दिवसांपासून तीन तलाकचा मुद्दा चर्चेत आहे. डिसेंबर 2016 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने तीन तलाकची पद्धत क्रूर असल्याचे सांगत मुस्लिम महिलांना दिलासा देण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉमध्ये काही सुधारणा करण्याबाबत विचारणा केली होती. तसेच तीन तलाक, बहुविवाह आणि हलाला याबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत.
#WATCH: Vice President Hamid Ansari"s wife Salma Ansari emphasises on reading Quran, says "Talaq Talaq Talaq kehne se koi talaq nahi hota" pic.twitter.com/08QxxaexRZ
— ANI (@ANI_news) April 8, 2017