थरकाप उडवणारा व्हिडीओ! पॅरासेलिंगदरम्यान पॅराशूट टर्न घेताच ३ जण खाली कोसळले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 03:33 PM2022-05-23T15:33:38+5:302022-05-23T15:36:00+5:30
Three Fall from Mid-air After Parachute Takes Turn :या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पॅरोशूटची दोरी एका बाजूने निसटली, त्यामुळे नियंत्रण गमावल्याने तिघे खाली पडले.
पॅरासेलिंग करणं जसं साहसी दिसते, त्यासोबत तसं जीवघेणा धोकाही ठरू शकतो. दमणमध्ये अशीच एक भयानक घटना घडली असून पॅरासेलिंग करताना हवेतून खाली पडून तीन जण जखमी झाले आहेत.
या थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून टेकऑफनंतर लगेचच तीन लोक खाली पडताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. पॅरासेलिंग करीत असताना तीन पर्यटक तब्बल १०० फुटांवरून खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तीन पर्यटक पॅराशूटवरुन टेक ऑफ केल्याच्या काही सेकंदात जमिनीवर कोसळतात. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पॅरोशूटची दोरी एका बाजूने निसटली, त्यामुळे नियंत्रण गमावल्याने तिघे खाली पडले.
थरकाप उडवणारा व्हिडीओ! पॅरासेलिंगदरम्यान पॅराशूट टर्न घेताच ३ जण खाली कोसळले अन्... pic.twitter.com/v8auzVisBn
— Lokmat (@lokmat) May 23, 2022
साधारण ३० सेकंदाच्या या व्हिडीओत पर्यटक या एडव्हेंचरसाठी उत्साही होते. तिघेही पॅराशूटसह वर उडताना दिसत आहेत. पॅराशूट हवेत वळण घेतल्यानंतर तिघे जमिनीवर पडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये, दीवमध्ये अशीच एक घटना घडली होती, जिथे पॅरासेलिंग करताना दोरी तुटल्याने एक जोडपे समुद्रात पडले होते. दीव येथे सुट्टीवर गेलेल्या गुजराती दाम्पत्याला सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. त्यांनी लाइफ जॅकेट घातले होते आणि समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी त्यांची त्वरीत सुटका केली.