केरळच्या तीन गोल्ड लोन कंपन्यांकडे बेल्जियम, ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त सोने
By admin | Published: December 27, 2016 10:14 AM2016-12-27T10:14:10+5:302016-12-27T10:14:10+5:30
सोने तारण ठेऊन कर्ज देणा-या केरळमधल्या आघाडीच्या तीन गोल्ड लोन कंपन्यांकडे जगातील अनेक श्रीमंत देशांपेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कोची, दि. 27 - सोने तारण ठेऊन कर्ज देणा-या केरळमधल्या आघाडीच्या तीन गोल्ड लोन कंपन्यांकडे जगातील अनेक श्रीमंत देशांपेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे. दोन वर्षात त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या साठयामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2016 च्या अखेरीस या कंपन्यांच्या ताब्यात 263 टन सोने होते.
मुत्थूट फायनान्स, मण्णपूरम फायनान्स आणि मुत्थूट फिनकॉर्प या तीन कंपन्यांकडे मिळून एकूण 263 टन सोन्याचा साठा आहे. बेल्जियम, सिंगापूर, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडे असणा-या सोन्यापेक्षा हा साठा जास्त आहे. जगभरातील सोन्याच्या मागणीमध्ये भारताचा वाटा 30 टक्के आहे.
सोने उद्या उपयोगाला येईल या मानसिकतेतून भारतात मोठया प्रमाणावर सोन्याची खरेदी केली जाते. एकटया केरळामध्ये सोन्याच्या व्यवसायात 2 लाख लोक नोकरी करतात. मागच्या दोन वर्षात मुत्थूट फायनान्सकडील सोन्याच्या साठयामध्ये 116 टनवरुन 150 टनांपर्यंत वाढ झाली आहे.
सिंगापूरकडे 127.4टन, स्वीडनकडे 125.7 टन, ऑस्ट्रेलियाकडे 79.9 टन, कुवेतकडे 79 टन, डेन्मार्ककडे 66.5 टन सोन्याचा साठा आहे. मणप्पूरम फायनान्सकडे 65.9 आणि मुत्थूट फिनकॉर्पकडे 46.88 टन सोन्याचा साठा आहे. तिघांकडे एकत्र मिळून 262.78 टन सोने आहे.