महाआघाडीची थ्री इडियटस्शी तुलना
By admin | Published: October 27, 2015 11:34 PM2015-10-27T23:34:52+5:302015-10-27T23:34:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, जेडीयू आणि राजद महाआघाडीची तुलना थ्री इडियटस्शी केली आहे. सोमवारी नितीशकुमार यांनी मुशायरा करीत थ्री इडियटस्चे गाणे गायले.
सीतामढी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, जेडीयू आणि राजद महाआघाडीची तुलना थ्री इडियटस्शी केली आहे. सोमवारी नितीशकुमार यांनी मुशायरा करीत थ्री इडियटस्चे गाणे गायले. आम्हाला थ्री पार्टनर माहीत होते; मात्र त्यांनी या चित्रपटाचे गाणे का गायले? या शब्दात टरही उडविली.
भ्रष्टाचार, राजकीय भाऊबंदकी असो, की गुन्हेगारांना संरक्षण देणे, नितीशकुमार हे आजकाल लालूप्रसाद यांच्याशी प्रत्येक बाबतीत स्पर्धा करीत आहेत. आता तर ते मनोरंजनाचीही स्पर्धा करू लागले आहेत.नितीशकुमार यांनी सोमवारी स्वत:ची ‘मुशायरा’ची कला दाखवून दिली. निकटस्थ आणि पत्रकारांसमक्ष मुशायरा किंवा कविता म्हणत लालूंना मात देऊ असे त्यांना वाटले असावे. महास्वार्थ आघाडीत राजद, जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष आहेत, मात्र आम्हाला नितीशकुमार यांनी थ्री इडियटस्मधील गाणे गायल्याबद्दल आश्चर्य वाटले. ८ तारखेला निवडणूक निकाल जाहीर होणार असून त्यानंतर त्यांना त्यासाठी संधी मिळेल, असा टोलाही मोदींनी हाणला. नितीशकुमार यांनी सोमवारी पत्रकारांसमोर थ्री इडियटस्च्या धर्तीवर कविता म्हणून दाखविली होती. ‘‘बहती हवा सा था वो, गुजरात से आया था वो, कालाधन लानेवाला था वो, कहा गया उसे ढूंढो... हमको देश की फिकर सताती, वो हर वक्त विदेश के दौरे लगाता, दाऊद को लाने वाला था वो, कहा गया उसे ढूंढो...’ या ओळी गात नितीशकुमार यांनी मोदींची टर उडविल्याने उपस्थितांनी दाद दिली होती. (वृत्तसंस्था)