तीन अवैध सावकारांचा कर्जवसुलीसाठी तगादा कर्जमाफीतून वगळले : जिल्‘ात १०१ जणांकडे अधिकृत परवाना

By admin | Published: January 19, 2016 11:04 PM2016-01-19T23:04:45+5:302016-01-19T23:04:45+5:30

जळगाव : दुष्काळ आणि नापिकीने शेतकरी होरपळत असताना विदर्भा पाठोपाठ जळगावात अवैध सावकारांनी शेतकर्‍यांना त्रास देणे सुरू केले आहे. घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात जमीन नावावर लिहून घेतल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी पाचोरा तालुक्यातील तीन सावकारांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे.

Three illegal lenders are exempted from debt relief due to debt relief: 101 licensed licenses in the district | तीन अवैध सावकारांचा कर्जवसुलीसाठी तगादा कर्जमाफीतून वगळले : जिल्‘ात १०१ जणांकडे अधिकृत परवाना

तीन अवैध सावकारांचा कर्जवसुलीसाठी तगादा कर्जमाफीतून वगळले : जिल्‘ात १०१ जणांकडे अधिकृत परवाना

Next
गाव : दुष्काळ आणि नापिकीने शेतकरी होरपळत असताना विदर्भा पाठोपाठ जळगावात अवैध सावकारांनी शेतकर्‍यांना त्रास देणे सुरू केले आहे. घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात जमीन नावावर लिहून घेतल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी पाचोरा तालुक्यातील तीन सावकारांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे.
जिल्‘ात १०१ अधिकृत सावकार
राज्य शासनातर्फे महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यानुसार अधिकृत सावकारी व्यवसायासाठी परवाना दिला जात असतो. त्यानुसार डिसेंबर २०१५ अखेर जिल्‘ातील १०१ जणांनी सावकारी व्यवसायासाठी लागणारा अधिकृत परवाना घेतला आहे.
जामनेर व जळगावात सर्वाधिक सावकार
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सावकारी व्यवसायासाठी अधिकृत परवाना दिला जात असतो. त्यात जळगाव तालुक्यात सर्वाधिक २४ सावकारांनी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ जामनेर तालुक्यात २१ तर चाळीसगाव तालुक्यात १८ जणांनी अधिकृत परवाना घेतला आहे. अमळनेर तालुका हा सावकार मुक्त आहे. एरंडोल व धरणगाव या तालुक्यात अवघ्या एका जणाने परवाना घेतला आहे.
सावकारांकडून दोन हजार कर्जदारांना पावणे तीन कोटीचे कर्ज
साहाय्यक उपनिबंधकांनी नोव्हेंबर २०१५ अखेरपर्यंत १८ नवीन सावकारांना परवाना दिला आहे. प्रशासनाने ८० जणांच्या दप्तराची तपासणी केली असता या सावकारांनी परवाना नूतनीकरण केले आहे. यांच्यामार्फत २०१३/१४ या आर्थिक वर्षात तीन हजार ७१२ कर्जदारांना एक कोटी ६२ लाख ६० हजार रुपयांचे तारण कर्ज दिले आहेत. तर एक लाख ४० हजाराचे विना तारण कर्ज दिले आहे. तर २०१५ मध्ये दोन हजार ११२ कर्जदारांना दोन कोटी ७९ लाख ३२ हजार रुपयांचे तारण कर्जाचे वाटप केले.

अवैध सावकाराविरुद्ध तीन तक्रारी
शासनातर्फे सावकारी व्यवसायाचा अधिकृत परवाना दिला जात असताना अनेक ठिकाणी हातउसनवारीच्या नावाखाली जादा व्याजदाराने शेतकर्‍यांना पैसे पुरविले जात असतात. कर्जदाराने पैसे परत न केल्यास त्याचे घर किंवा शेत तारण करून त्यावर कब्जा केला जातो. अवैध सावकारी करणार्‍या पाचोरा तालुक्यातील तीन जणांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रारी प्राप्त आहेत. या सर्वांविरुद्ध तालुका उपनिबंधकांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार नोटीस जारी केली. त्यानंतर ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांच्या घराची तपासणी करून अवैध सावकारीशी संबंधित काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या तिघा सावकारांनी कर्जाच्या बदल्यात शेतजमीन नावावर केल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: Three illegal lenders are exempted from debt relief due to debt relief: 101 licensed licenses in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.