तीन भारतीय युएईतून हद्दपार

By admin | Published: January 30, 2016 12:07 AM2016-01-30T00:07:58+5:302016-01-30T00:07:58+5:30

इसिस या दहशतवादी संघटनेबाबत सहानुभूती बाळगणाऱ्या तीन भारतीय युवकांना संयुक्त अरब अमिरातमधून (युएई) भारतात हद्दपार करण्यात आले आहे. हे तिघेही भारतात आणि काही

Three Indian expatriates from the UAE | तीन भारतीय युएईतून हद्दपार

तीन भारतीय युएईतून हद्दपार

Next

नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेबाबत सहानुभूती बाळगणाऱ्या तीन भारतीय युवकांना संयुक्त अरब अमिरातमधून (युएई) भारतात हद्दपार करण्यात आले आहे. हे तिघेही भारतात आणि काही अन्य देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्याच्या मोहिमेवर असल्याचा आरोप आहे.
अदनान हुसैन, मोहम्मद फरहान आणि शेख अजहर अल इस्लाम अशी या भारतीयांची नावे आहेत. या तिघांनाही युएईतून हद्दपार करून भारतात पाठविण्यात आले. गुरुवारी रात्री ते नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांना ताब्यात घेतले. ते महाराष्ट्र, कर्नाटक व जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत.
माहितीनुसार, हे तिघेही आपल्या अन्य अज्ञात सहकाऱ्यांसमवेत भारत व अन्य मित्र राष्ट्रांमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी भारत आणि अन्य देशांमधील भारतीय नागरिकांची भरती आणि प्रशिक्षण देण्याचे काम करीत होते. हे तिघेही इसिसच्या अबूधाबी गटाचे सदस्य असल्याचा संशय आहे. एनआयए या तिघांचीही चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करेल आणि त्यानंतर त्यांना लवकरच अटक होईल.
याआधी युएईने १५ सप्टेंबर २०१५ रोजी इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून चार भारतीयांना हद्दपार केले होते. त्यानंतर युवकांना इसिसकडे आकर्षित करण्याचे काम केल्याच्या आरोपावरून ३७ वर्षीय आफसा ऊर्फ निक्की जोसेफ या महिलेलाही हद्दपार करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

मुख्तार अब्बास नक्वींनाही धमकी
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनाही इसिसकडून धमकी देणारे पत्र मिळाले आहे. याबाबत दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. नकवी यांच्यानिवासस्थानी २५ जानेवारी रोजी धमकी पत्र प्राप्त झाले. उर्दू व इंग्रजीत लिहिलेले हे पत्र पोस्टाने आले आणि त्यात अर्वाच्च शब्द वापरले गेले.

Web Title: Three Indian expatriates from the UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.