‘जैश-ए-मोहम्मद’चे तीन दहशतवादी ठार, श्रीनगरमध्ये चकमक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 06:15 AM2022-01-01T06:15:09+5:302022-01-01T06:15:55+5:30
Srinagar : या तीन दहशतवाद्यांपैकी एक सुहैल अहमद राथेर हा १३ डिसेंबर रोजी झेवान भागाजवळ पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. त्या हल्ल्यात ३ पोलीस ठार व ११ जण जखमी झाले होते.
श्रीनगर : सुरक्षादलासोबत येथील पानथा चौक भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’चे (जेईएम) तीन दहशतवादी ठार तर पाच सुरक्षादल कर्मचारी जखमी झाले, असे पोलीस म्हणाले.
या तीन दहशतवाद्यांपैकी एक सुहैल अहमद राथेर हा १३ डिसेंबर रोजी झेवान भागाजवळ पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. त्या हल्ल्यात ३ पोलीस ठार व ११ जण जखमी झाले होते. ३६ तासांत ९ दशहतवाद्यांना ठार मारले आहे. पानथा चौक भागात ही चकमक झाली. सुरक्षादलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावर त्यांना प्रत्युत्तर दिले गेले.
८० दहशतवादी अटकेत
२०२१ मध्ये जम्मू व काश्मीरमध्ये ८० दहशतवाद्यांना अटक झाली असून, ४९७ जणांवर यूएपीएअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत, असे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले. पानथा चौकाजवळ पोलिसांच्या बसवर हल्ला केलेल्या जैश ए मोहम्मदच्या नऊ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. १३४ तरुण जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनात दाखल झाले होते. त्यापैकी ७२ जणांना ठार मारण्यात आले तर, २२ जणांना अटक झाली.