चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अपमान करणा-या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 12:49 PM2017-08-21T12:49:00+5:302017-08-21T14:00:25+5:30

राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे

Three Kashmiri students arrested for insulting National Anthem | चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अपमान करणा-या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक

चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अपमान करणा-या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक

हैदराबाद, दि. 21 - राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत लागलं असतानाही हे विद्यार्थी सन्मानार्थ उभे न राहिल्याने त्याच्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी हे तिघे मित्र राजेंद्र नगर पोलीस स्टेशनजवळील मंत्रा मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले असता ही घटना घडली. चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लागलं असता हे तिघेही बसून राहिले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

'रविवारी आम्हाला तरुणांची तक्रार करणारा एक फोन आला होता. यावेळी चित्रपटगृहात राष्ट्रगीत लागलं असतानाही हे तरुण सन्मानार्थ उभे न राहिल्याचा आरोप करण्यात आला होता. तसंच जेव्हा इतर लोक उभे राहिले होते तेव्हा हे तिघे हसत होते', अशी माहिती राजेंद्र नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवा प्रसाद यांनी दिली आहे. 

तक्रारीनंतर तिघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. अटक करण्यात आलेले तिघेही विद्यार्थी जम्मू काश्मीरमधील बारामुल्लाचे असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

'तिघे अल-हबीब कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी-टेकचं शिक्षण घेत आहेत. राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा गुन्हा आम्ही त्यांच्यावर दाखल केला आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 

देशभरातील सर्व चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत बंधनकारक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सोबतच स्क्रीनवर तिरंगा दाखवण्यात यावा असंही आदेशात सांगण्यात आलं होतं. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर चित्रपटगृहात उपस्थित सर्व प्रेक्षकांनी उभं राहून राष्ट्रगीताचा मान राखावा असं या आदेशात सांगितलं होतं. तसंच आपल्या फायद्यासाठी राष्ट्रगीताचा वापर करण्यात येऊ नये असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. 

मात्र राष्ट्रगीत चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग असेल तर त्यासाठी उभं राहण बंधनकारक नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच चित्रपट सुरु झाल्यानंतर त्यामध्ये राष्ट्रगीत वापरले असल्यास त्यासाठी उभं राहणं बंधनकारक नसणार आहे. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीला लावण्यात येणा-या राष्ट्रगीतासाठी उभं राहावं असं न्यायालयाने सांगितलं होतं. सोबतच राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं की नाही यावर चर्चा करणं गरजेचं असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. 

चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सुरू असताना प्रेक्षकांनी उभे राहण्याच्या किंवा राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही अशा प्रकारे स्तब्ध राहण्याच्या आधी दिलेल्या अंतरिम आदेशातून सर्वोच्च न्यायालयाने काही प्रकारच्या दिव्यांगाना सूट दिली आहे. ही सवलत चाकाची खुर्ची वापरणारे, ऑटिझम, सेलेब्रल पाल्सी, पार्किन्सन्स, मल्टिपल स्केरॉसिस, स्नायू शैथिल्य असे आजार झालेले, कुष्ठरोगातून बरे झालेले आणि अंध व कर्णबधिरांना लागू आहे.

Web Title: Three Kashmiri students arrested for insulting National Anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत