काश्मीर खो-यात तीन अतिरेकी ठार, लष्कराची अनंतनागमध्ये शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:48 AM2018-03-13T04:48:53+5:302018-03-13T04:48:53+5:30
जम्मू आणि काश्मीरच्या हाकुरा (जिल्हा अनंतनाग) भागात सोमवारी पहाटे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. इथे अतिरेकी असल्याची माहिती मिळताच शोधमोहीम रविवारी रात्री सुरू केली गेली होती, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या हाकुरा (जिल्हा अनंतनाग) भागात सोमवारी पहाटे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. इथे अतिरेकी असल्याची माहिती मिळताच शोधमोहीम रविवारी रात्री सुरू केली गेली होती, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
ठार झालेल्या अतिरेक्यांची नावे एसा फाझिल (रा. श्रीनगर) आणि सईद ओवेस (रा. कोकेरनाग, अनंतनाग) असून तिसºयाची ओळख पटलेली नाही. हे अतिरेकी कोणत्या गटाशी संबंधित हे ही समजलेले नाही. सुरक्षादलांनी घटनास्थळावर एके ४७ रायफल्स, पिस्तोल्स, हँड-ग्रेनेड्स जप्त केले. लष्कराची या कारवाईत कोणतीही हानी झालेली नाही. ठार झालेल्यांपैकी एकाचा श्रीनगरमध्ये सौरा येथील पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. काश्मीर खोºयातील लोकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. अनेक भागांत युवकांचे गट आणि सुरक्षा दलांसोबत चकमकी उडाल्या.
>८ ठिकाणी जमावबंदी
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने श्रीनगरमधील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदी आदेश लागू केला तर शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था बंद केल्या, असे वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. काश्मीर विद्यापीठाने दिवसभरासाठी वर्ग बंद ठेवले तसेच परीक्षाही पुढे ढकलल्या. या लांबणीवर टाकल्या गेलेल्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल, असे विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले.
श्रीनगर कारागृहातून
२५ मोबाईल हस्तगत
अतिरेकी कारवायांसाठी भरतीची सूत्रे तुरुंगातून हलविली जातात, हही माहिती मिळताच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व काश्मीर पोलिसांनी कारागृहाच्या घेतलेल्या झडतीत २५ मोबाईल फोन, काही सिमकार्ड, एक आयपॉड जप्त केला.