तीन अपघातात दोन ठार, दोन जखमी पोलिसांमुळे वाचले एकाचे प्राण : वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने वाडीशेवाळेचा तरुण तर विहिरीत पडून असोदा ग्रा.प.चा.कर्मचारी

By admin | Published: January 2, 2016 08:33 AM2016-01-02T08:33:13+5:302016-01-02T08:33:13+5:30

जळगाव: सरत्या वर्षात रस्ते अपघाताची सुरू असलेली अपघाताची मालिका नवीन वर्षातही कायम राहिली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर व जिल्‘ात झालेल्या तीन अपघातात दोनजण ठार झाले. असोदा,ता.जळगाव येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पाण्याची विद्युत मोटार काढताना विहिरीत पडून यशवंत दगडू ढाके (वय ५१) यांचा मृत्यू झाला. ढाके हे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी होते. तर दुसर्‍या घटनेत वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सलीम सरदार तडवी (मुळ रा.बांबरुड राणीचे ह.मु.वाडीशेवाळे ता.पाचोरा) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र युनूस तडवी (वय १८, रा.वाडीशेवाळे) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात वाडीशेवाळे-खडकदेवळा रस्त्यावर झाला. मनोज नारायण तासकर (वय ३९, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) या दुचाकीस्वाराला महामार्गावर ट्रकने धडक दिल्याने तो गंभीर जखमी

Three killed in two accidents, two injured policemen survived one life: one of the victims: Sand of the Wadiishwale, beaten by a sand tractor, fell into the well and the G.P. | तीन अपघातात दोन ठार, दोन जखमी पोलिसांमुळे वाचले एकाचे प्राण : वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने वाडीशेवाळेचा तरुण तर विहिरीत पडून असोदा ग्रा.प.चा.कर्मचारी

तीन अपघातात दोन ठार, दोन जखमी पोलिसांमुळे वाचले एकाचे प्राण : वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने वाडीशेवाळेचा तरुण तर विहिरीत पडून असोदा ग्रा.प.चा.कर्मचारी

Next
गाव: सरत्या वर्षात रस्ते अपघाताची सुरू असलेली अपघाताची मालिका नवीन वर्षातही कायम राहिली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर व जिल्‘ात झालेल्या तीन अपघातात दोनजण ठार झाले. असोदा,ता.जळगाव येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पाण्याची विद्युत मोटार काढताना विहिरीत पडून यशवंत दगडू ढाके (वय ५१) यांचा मृत्यू झाला. ढाके हे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी होते. तर दुसर्‍या घटनेत वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सलीम सरदार तडवी (मुळ रा.बांबरुड राणीचे ह.मु.वाडीशेवाळे ता.पाचोरा) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र युनूस तडवी (वय १८, रा.वाडीशेवाळे) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात वाडीशेवाळे-खडकदेवळा रस्त्यावर झाला. मनोज नारायण तासकर (वय ३९, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) या दुचाकीस्वाराला महामार्गावर ट्रकने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
वाहतुक पोलिसांमुळे वाचले प्राण
जळगाव येथील मनोज नारायण तासकर हे शुक्रवारी कामानिमित्त नशिराबादला गेले होते. तेथून परत येत असताना दुपारी साडे बारा वाजता महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकीपासून काही अंतरावर समोरुन येणार्‍या ट्रकने कट मारल्याने ते दुचाकीवरुन (क्र.एम.एच.१९ सी.सी.६३२३) घसरुन कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. हा अपघात झाला तेव्हा अनेकजण रस्त्यावरुन वापरत होते, मात्र कोणीही थांबायला तयार नव्हते. तासकर हे जखमी अवस्थेत विव्हळत असताना रस्त्यावरुन जाणार्‍या एका दुचाकीस्वाराने पुढे गेल्यावर पेट्रोलिंगला असलेल्या वाहतूक पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यावेळे हेडकॉन्स्टेबल रवींद्र मोरे,अजित तडवी व ट्रॅफिक वार्डन दीपक भालेराव यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मोरे व तडवी यांनी त्यांना एका खासगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणले तर भालेराव यांनी त्यांची दुचाकी आणली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तासकर यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या पत्नीला अपघाताची माहिती दिली.उपचार सुरू झाल्यावर व त्यांची पत्नी आल्यावर पोलीस तेथून रवाना झाले. दरम्यान, पोलिसांनी वेळीच दाखल केल्याने तासकर यांचे प्राण वाचले.

Web Title: Three killed in two accidents, two injured policemen survived one life: one of the victims: Sand of the Wadiishwale, beaten by a sand tractor, fell into the well and the G.P.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.