बंद घरातून तीन लाखाचे दागिने लांबवले
By Admin | Published: July 19, 2016 11:41 PM2016-07-19T23:41:55+5:302016-07-19T23:41:55+5:30
जळगाव : शहरात सातत्याने होणार्या जबरी चोरी व घरफोडीच्या घटनांनी पोलीस दल जेरीस आले असतानाच सोमवारी पुन्हा महामार्गाला लागून असलेल्या कयुम देशमुख नगरात मुश्ताक अहमद मोहम्मद मजीद शेख (वय ६५) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे दागिने लांबवले आल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजा बंद करुन मागील दरवाजातून पोबारा केला आहे.
ज गाव : शहरात सातत्याने होणार्या जबरी चोरी व घरफोडीच्या घटनांनी पोलीस दल जेरीस आले असतानाच सोमवारी पुन्हा महामार्गाला लागून असलेल्या कयुम देशमुख नगरात मुश्ताक अहमद मोहम्मद मजीद शेख (वय ६५) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे दागिने लांबवले आल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजा बंद करुन मागील दरवाजातून पोबारा केला आहे.मुश्ताक शेख हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. महामार्गाला लागून असलेल्या बॉम्बे बेकरीजवळी कयुम देशमुख नगरात अबु बकर मशीदीजवळ ते वास्तव्याला आहेत. मुलगी साजीया हिच्या लग्नासाठी स्थळ आल्याने मुलाच्या परिवाराला भेटण्यासाठी ते कुटूंबासह सोमवारी सकाळी दहा वाजता चाळीसगावला गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून रात्री अकरा वाजता घरी परत आले.मुख्य दरवाजा होता आतून बंदशेख यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडला नाही. आतून बंद असल्याचे जाणवले. दरवाजा आतून बंद कसा असा प्रश्न त्यांना पडला, त्यामुळे मागील दरवाजाकडे जात असतांनाच खिडकीतून डोकावून पाहिले तर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. घरात जावून पाहिले तर कपाट व त्यातील लॉकर उघडे होते. त्यात ठेवलेले दागिने पाहिले तर तेही गायब झाले होते. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.श्वान पथकाकडून तपासणीघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक समाधान पाटील व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांनी रात्री व सकाळी घराची पाहणी केली. मंगळवारी पंचनामा झाल्यानंतर संशयित गुन्हेगारांची माहिती काढून चौकशी करण्यात आली. फिंगर प्रिंट व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काय चोरी झाला मुद्देमाल८० हजार किमतीचा ४० ग्रॅम सोन्याचा हार६० हजार किमतीचा ३० ग्रॅम सोन्याचा हार७५ हजार किमतीचे ३५ ग्रॅमचे सोन्याचे सिक्के२८ हजार किमतीची १४ ग्रॅमची सोन्याची साखळी२० हजार किमतीची १० ग्रॅमची पन्ना मोती पोत२० हजार किमतीच्या सोन्याच्या बागंड्या१२ हजार किमतीच्या ६ ग्रॅमच्या कानातील सोन्याची बाा६ हजार किमतीची ३ ग्रॅमची अंगठी४ हजार किमतीच्या २ ग्रॅमच्या सोन्याच्या बागंड्यापाचशे रुपये किमतीचे उमविचे गोल्ड मेडल