निवृत्त विक्रीकर निरीक्षकाच्या घरातून पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास

By admin | Published: October 25, 2016 12:49 AM2016-10-25T00:49:00+5:302016-10-25T00:49:00+5:30

जळगाव: घर बंद असल्याची संधी साधत पिंप्राळा शिवारातील सिध्दी विनायक कॉलनीत राहणार्‍या निवृत्त विक्रीकर निरीक्षक रमेश रामदास तायडे (वय ६१) यांच्या घरातून चोरट्यांनी दोन लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. १० ते १६ ऑक्टोबर या दरम्यान घडलेली घटना सोमवारी उघड झाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three lacs of laps from the house of the retired sales tax inspector | निवृत्त विक्रीकर निरीक्षकाच्या घरातून पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास

निवृत्त विक्रीकर निरीक्षकाच्या घरातून पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास

Next
गाव: घर बंद असल्याची संधी साधत पिंप्राळा शिवारातील सिध्दी विनायक कॉलनीत राहणार्‍या निवृत्त विक्रीकर निरीक्षक रमेश रामदास तायडे (वय ६१) यांच्या घरातून चोरट्यांनी दोन लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. १० ते १६ ऑक्टोबर या दरम्यान घडलेली घटना सोमवारी उघड झाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश तायडे हे ९ ऑक्टोबर रोजी पुणे येथे गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. कपाट ठेवलेले ५० हजार रुपये किमतीचे दागिने, १० हजार रुपये रोख व विविध बॅंकाच्या चार एटीएम कार्ड त्यांच्या हाती लागले. विशेष म्हणजे या एटीएम कार्डवर त्यांचे पासवर्डही लिहिलेले होते, त्यामुळे चोरट्यांनी एटीएम कार्डचा वापर एका एटीएम कार्डच्या सहाय्याने १ लाख ९० हजार तर दुसर्‍या एटीएममधून २२ हजार ८०० असे २ लाख १२ हजार ८०० रुपये काढले आहेत. तायडे हे सोमवारी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे.
खिडकीतून हात घालून लांबवला १३ हजाराचा ऐवज
कुटूंब झोपलेले असताना खिडकीतून हात घालून टेबलावर ठेवलेले तीन मोबाईल व पाच हजार ८०० रुपये रोख असलेले पाकीट चोरट्यांनी लांबविल्याची घटना रविवारी मध्यरात्री मालती नगरातील गणेश लोकेश वडनेरे यांच्या घरात घडली. खिडकीतून बॅग न निघाल्याने त्यातील लॅपटॉप सुरक्षित राहिला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राधाकृष्ण नगरातील मालती नगरात राहणारे गणेश वडनेरे हे काम आटोपून रात्री एक वाजता झोपले होते. सकाळी सहा वाजता वडनेरे यांचे भाऊ दीपक हे अंगणात आले असता कंपाऊंडच्या भींतीवर सिमकार्ड, पाकीट व त्यातील कागदपत्रे फेकलेली दिसून आली.

Web Title: Three lacs of laps from the house of the retired sales tax inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.