गावठी दारुचे तीन लाखाचे रसायन उद्ध्वस्त राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : दोन जणांना अटक, पहाटेच्या सुमारास राबविले कारवाई सत्र
By admin | Published: January 22, 2016 10:41 PM2016-01-22T22:41:06+5:302016-01-22T22:41:06+5:30
फोटो
Next
फ टोजळगाव: गावठी दारुमुळे शहरात दोन जणांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवार व शुक्रवारी जिल्ात धडक कारवाईची मोहीम राबवून दोन लाख ९२ हजार ७६७ रुपयांचे रसायन व गावठी दारु नष्ट केली. यावेळी दारुच्या भट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.शहरातील गेंदालाल मील भागात दोन दिवसापूर्वी गावठी दारुमुळे दोन जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांनी शहरात कुठे दारुच्या भट्या आहेत तसेच कुठून दारुची आयात होते याचा आढावा घेवून विभागीय निरीक्षक सी.पी.निकम यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार केले होते. या पथकाने शुक्रवारी पहाटे सहा वाजता गिरणा नदी पात्राशेजारी कांताई बंधार्याला लागून कढोली शिवारात छापा टाकला. वाल्मिक रामा कोळी हा गावठी दारू गाळत असताना रंगेहाथ सापडला. तर गुलाब सीताराम तायडे हा गावठी दारुची वाहतूक करताना आढळला.यावेळी भी उद्ध्वस्त करुन एक लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. एक दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.बी.१५७६) ताब्यात घेण्यात आली. विभागीय निरीक्षक सी.पी.निकम, दुय्यम निरीक्षक जी.बी.इंगळे, एम.पी.पवार, जमादार एम.आर.वाघ, एच.एन.ब्रााणे, भूषण वाणी, प्रवीण वाघ, संतोष निकम, मुकेश पाटील, यशोधर जोशी, नंदू पवार व व्ही.बी.परदेशी यांनी ही मोहीम राबविली.दुर्गम भागातही धाडसत्रमध्यप्रदेश सिमेवर असलेल्या पाडला ता.रावेर या अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारुच्या भट्या असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार तेथेही पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता दारु गाळणारे फरार झाले, मात्र भा उद्ध्वस्त करुन ८१ हजार ९९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ तालुक्यातील तापी काठी असलेल्या भाणखेडा, शिवपूर कन्हाळा तसेच जळगाव शहरातील कंजरवाडा, सिंगापुर, तांबापुरा व जाखनी नगर आदी ठिकाणी ११ हजार ४५० लीटर रसायन व ३७४ लीटर दारू जप्त करण्यात आली.कोट..गावठी दारुविरुध्द कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. दोन दिवसात लाखो रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. यापुढेही कारवाईची मोहीम सुरुच राहणार आहे. नागरिकांनी माहिती कळवावी, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.-सी.पी.निकम, विभागीय निरीक्षक