बनावट डीडी देऊन तीन लाखांची फसवणूक तीन दुकानदारांची तक्रार
By admin | Published: June 1, 2015 10:13 PM2015-06-01T22:13:47+5:302015-06-02T16:21:21+5:30
अहमदनगर : शहरातील तीन वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमधून एका भामट्याने तीन वेगवेगळे डिमांड ड्राफ्ट देऊन दुकानमालकांची तीन लाख रुपयांना फसवणूक केली आहे. डिमांड ड्राफ्ट दिल्यानंतर त्या भामट्याने एका टेम्पोतून किमती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेल्या. ड्राफ्ट वठला न गेल्याने ही फसवणूक झाल्याचे उघड झाले.
अहमदनगर : शहरातील तीन वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमधून एका भामट्याने तीन वेगवेगळे डिमांड ड्राफ्ट देऊन दुकानमालकांची तीन लाख रुपयांना फसवणूक केली आहे. डिमांड ड्राफ्ट दिल्यानंतर त्या भामट्याने एका टेम्पोतून किमती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेल्या. ड्राफ्ट वठला न गेल्याने ही फसवणूक झाल्याचे उघड झाले.
याबाबत तीन दुकानदारांनी एकत्र दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीपेठेतील इझी इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक जोहर सालेभाई रामपूरवाला (वय ५०, रा. कोहिनूर प्लाझा, पत्रकार चौक) यांनी फिर्याद दिली आहे. रामपूरवाला यांच्या दुकानात २० मे रोजी महेश भाई नावाचा इसम आला. आठ दिवसांनी माझा एक व्यक्ती डीडी घेऊन येईल, त्याला तुमच्या दुकानातील दोन ए.सी., एक एलईडी अशा वस्तू देण्याचे सांगितले. महेश भाई याने यावेळी साई ट्रेडिंग कंपनी शॉप नं. ३१/१२, साई कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ, सातारा असा पत्ता सांगितला. २९ मे रोजी महेश भाई यांचा प्रतिनिधी सागर पाचपुते दुकानात आला. त्याने सिंडिकेट बँकेचा १ लाख १५ हजार रुपये किमतीचा डिमांड ड्राफ्ट दिला ए.सी. आणि एलईडी नेला. मर्चंट बँकेत दिलेला डीडी बनावट असल्याने तो वठला नाही, असे बँकेने स्पष्ट केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
दुसरे तक्रारदार सुनील गिरीधरदास पारेख (वय ५०, रा. घुमरे गल्ली) यांच्याही दुकानातून ८० हजार ६४० रुपयांचा ड्राफ्ट देऊन विविध प्रकारचे कॉक घेऊन गेला. तिसरी तक्रार यश कॉम्प्युटरचे हर्षद संजय भंडारे (रा. बुरुडगाव रोड, स्वाती कॉलनी) यांनी दिली. त्यांच्याकडे १ लाख १०० रुपयांचा डीडी देऊन लॅपटॉप घेऊन गेला. या तिन्ही दुकानातून २ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
-----------
तिघांनाही एकाच क्रमांकाचा ड्राफ्ट
महेश भाई यांच्या प्रतिनिधीने तिन्ही दुकानदारांना एकाच क्रमांकाचा आणि वेगवेगळ्या रकमेचा डीडी दिला. तिघांचेही डीडी बनावट असल्याने ते परत आले. त्यानंतरच दुकानदारांना ते वठले नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
-----------