मेहबूबा मुफ्तींच्या 'त्या' विधानावर पीडीपी नेते नाराज, तिघांनी दिला राजीनामा
By ravalnath.patil | Published: October 26, 2020 08:37 PM2020-10-26T20:37:14+5:302020-10-26T20:38:47+5:30
mehbooba mufti : राजीनामा देणाऱ्या पीडीपी नेत्यांमध्ये टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन-ए-वफा यांच्या नावांचा समावेश आहे.
श्रीनगर : जोपर्यंत जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही, असे विधान जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी केले होते. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती या विधानावर नाराज होत पीडीपीच्या तीन नेत्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या पीडीपी नेत्यांमध्ये टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन-ए-वफा यांच्या नावांचा समावेश आहे.
'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, "पीडीपी नेते टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन-ए-वफा यांनी पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. या नेत्यांनी मेहबूबा मुफ्ती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही तुमच्या काही कामांवर, वक्तव्यांवर नाराज आहोत. विशेष म्हणजे, देशभक्तीच्या भावनेचा अनादर केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्हाला अस्वस्थ वाटत आहे."
PDP leaders TS Bajwa, Ved Mahajan & Hussain A Waffa resign from the party.
— ANI (@ANI) October 26, 2020
In a letter to party pres Mehbooba Mufti (in file pic) they state that they are 'feeling quite uncomfortable over some of her actions and undesirable utterances specially which hurt patriotic sentiments'. pic.twitter.com/EsjoZn5geq
दरम्यान, गेल्या शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत याबाबत विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, आम्ही कलम ३७० पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. तसेच, मेहबूबा मुफ्ती यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केले. जेव्हा आमचा जम्मू काश्मीरचा ध्वज परत येईल, तेव्हाच आम्ही तो (तिरंगा) ध्वजही घेऊ. काश्मीरचा ध्वज आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तो आमचा ध्वज आहे. या ध्वजासोबत आमचे नाते आहे, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांनीही असंच वादग्रस्त विधान केले होते, काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता, मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही. परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत, असं फारुक अब्दुला म्हणाले होते.