सुरत जिंकण्यासाठी तीन मराठी माणसांमध्ये लढत, प्रचारासाठी महाराष्ट्रातूनही आले मित्र-नातेवाईक
By शांतीलाल गायकवाड | Published: November 26, 2022 11:37 AM2022-11-26T11:37:41+5:302022-11-26T11:38:41+5:30
इथे मराठी भाषिकांची संख्या जवळपास ८० हजार आहे. लोकसभेच्या नवसारी मतदारसंघात लिंबायत मोडेते. इथे भाजपचे सी. आर. पाटील खासदार आहेत. विद्यमान आमदार संगीता पाटील भाजपच्याच आहेत. काॅंग्रेसने गोपाल देविदास पाटील यांना तर आम आदमी पार्टीने पंकज तायडे यांना उमेदवारी दिली.
शांतीलाल गायकवाड -
लिंबायत-सुरत : सुरत शहराचे उपनगर असलेल्या लिंबायत मतदारसंघातून विजयाचे दावेदार तिघेही मराठी भाषक व महाराष्ट्रीय वंशाचे आहेत. हा मतदारसंघच स्थलांतरीत कामगारांचा असून तेथील विद्यमान आमदार व खासदारही मराठा (कुणबी) पाटील परिवारातील आहेत. मराठ्यांची ही लढत चांगलीच चुरशीची झाली असून प्रचार फेऱ्या, सभांमधून मराठीतून जोरदार भाषणे होत आहेत.
इथे मराठी भाषिकांची संख्या जवळपास ८० हजार आहे. लोकसभेच्या नवसारी मतदारसंघात लिंबायत मोडेते. इथे भाजपचे सी. आर. पाटील खासदार आहेत. विद्यमान आमदार संगीता पाटील भाजपच्याच आहेत. काॅंग्रेसने गोपाल देविदास पाटील यांना तर आम आदमी पार्टीने पंकज तायडे यांना उमेदवारी दिली.
आ. संगिता पाटील (भाजप) -
मूळच्या पाचोरा (जळगाव) येथील. वडील तुळसीदास पाटील पोलीस दलात. शिक्षण डहाणूयेथील संस्थेत. राजेंद्र पाटील यांच्याशी विवाहानंतर लिंबायतवासी.
गोपाल पाटील (काँग्रेस) -
मूळचे अंमळनेरचे. १०वी पर्यंतचे शिक्षण आव्हाना हायस्कूलमध्ये. कामधंदा निमित्ताने सुरतमध्ये. आम्लेटची गाडी चालवली. सर्वांच्या मदतीला धावणारे अशी ओळख.
पंकज तायडे (आम आदमी पार्टी) -
मूळचे आडगाव कसारखेडाचे (यावल). पोटापाण्यासाठी येथे आले. बांधकाम मजूर म्हणून येथे आलेले तायडे आज येथे बांधकाम ठेकेदार म्हणून ओळखले जातात.