तीन मेट्रीक टन फोरेट किटकनाशक जप्त अप्रमाणित आढळलेे : जि.प.कृषी विभागाची कारवाई
By admin | Published: August 7, 2016 12:40 AM2016-08-07T00:40:56+5:302016-08-07T00:40:56+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या किटकनाशके व इतर नमुने तपासणीत तीन मेट्रीक टन ४७६ किलो एवढे फोरेट हे किटकनाशक अप्रमाणित आढळले. हे फोरेट पुष्कर या औरंगाबाद येथील कंपनीचे असून, ते जप्त करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शनिवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जि.प.कृषी विभागातून मिळाली.
Next
ज गाव : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या किटकनाशके व इतर नमुने तपासणीत तीन मेट्रीक टन ४७६ किलो एवढे फोरेट हे किटकनाशक अप्रमाणित आढळले. हे फोरेट पुष्कर या औरंगाबाद येथील कंपनीचे असून, ते जप्त करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शनिवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जि.प.कृषी विभागातून मिळाली. जि.प.कृषी विभागाला बियाणे, किटकनाशके व खते यांचे नमुने तपासणीचा लक्ष्यांक दिला आहे. या अंतर्गत कार्यवाही सुरू असून, किटकनाशकांचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी शासनाच्या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यात संबंधित नमुने अप्रमाणित आढळले. त्यानंतर मोहीम अधिकारी प्रदीप ठाकरे, जिल्हा कृषी अधिकारी सुरेंद्र पाटील व पथकाने हे फोरेट पाळधी येथे दीपक कृषी केंद्रात कारवाई केली. खतांचे १६ तर किटकनाशकांचे दोन नमुने अप्रमाणितजि.प.च्या कृषि विभागाने यंदा आतापर्यंत २९९ नमुने खतांचे तपासले. त्यातील १६ नमुने अप्रमाणित आढळले. तर किटकनाशकांचे २१ नमुने तपासले असून, पैकी दोन नमुने अप्रमाणित आढळले. बियाण्यांचे ३८४ नमुने तपासले आहेत. पुणे व नाशिक येथील प्रयोगशाळांमध्ये हे नमुने तपासण्यात आल्याची माहिती जि.प.चे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.