जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार

By admin | Published: April 21, 2016 09:28 AM2016-04-21T09:28:16+5:302016-04-21T11:32:41+5:30

जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातील लोलाब परिसरात दहशतवादी व सुरक्षा जवानांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे.

Three militants killed in Jammu and Kashmir encounter | जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार

Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २१ - जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातील लोलाब परिसरात दहशतवादी व सुरक्षा जवानांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोलाब भागातील पुत्शाही परिसरात काही दहशतवादी लपल्याची खबर मिळताच सुरक्षा जवानांनी शोधमोहिम सुरू केली असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर देताना तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. मात्र या परिसरात अद्याप आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त होत असून चकमक जारी आहे.

Web Title: Three militants killed in Jammu and Kashmir encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.