तीन नक्षलींना कंठस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2016 02:58 AM2016-05-22T02:58:05+5:302016-05-22T02:58:05+5:30
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत नक्षली दाम्पत्यासह तीन नक्षलवादी ठार झाले.
रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत नक्षली दाम्पत्यासह तीन नक्षलवादी ठार झाले. मृत नक्षली दाम्पत्याची नावे मनोज हपका आणि त्याची पत्नी टाटी अशी आहेत. मनोज हा स्थानिक नक्षली गटाचा कमांडर होता.
केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) ८५ वी तुकडी आणि कोब्रा कमांडोंच्या संयुक्त पथकाने गंगलूर पोलिसांच्या मदतीने कोटर केरेनार जंगलात शोधमोहीम सुरू केली होती. या दरम्यान शुक्रवारी रात्री २.५० वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार सुरूकेल्यावर सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरात कारवाई केली. काही काळ चकमकीनंतर नक्षली तेथून पसार झाले. नंतर सुरक्षा जवानांना घटनास्थळी एका पोषाखधारी महिलेसह दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्या जवळून दोन बंदुका आणि दररोज उपयोगाचे काही सामान जप्त करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत राज्याच्या कांकेर जिल्ह्यात कारवाईदरम्यान एक महिला नक्षलवादी ठार झाली.