तीन बीओंंमुळे लटकले बदली प्रस्तावांचे काम सु˜ीलाही अधिकारी कामावर : तिघांना देणार नोटिसा

By admin | Published: April 24, 2016 07:02 PM2016-04-24T19:02:21+5:302016-04-24T19:02:21+5:30

जळगाव- प्राथमिक शिक्षण विभागामध्ये विनंती व प्रशासकीय बदल्यांचे प्रस्ताव तपासणीसंबंधी ४ थ्या शनिवारची सु˜ी असतानाही कामकाज सुरू होते. पण चोपडा, भडगाव आणि रावेर येथील गटशिक्षणाधिकारी (बीओ) आले नसल्याने हे प्रस्ताव मुख्यालयीन स्तरावर अंतिम करून तालुकास्तरावर गटसाधन केंद्रात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही मात्र होऊ शकणार नाही.

Three officials working for the proposed change of proposals | तीन बीओंंमुळे लटकले बदली प्रस्तावांचे काम सु˜ीलाही अधिकारी कामावर : तिघांना देणार नोटिसा

तीन बीओंंमुळे लटकले बदली प्रस्तावांचे काम सु˜ीलाही अधिकारी कामावर : तिघांना देणार नोटिसा

Next
गाव- प्राथमिक शिक्षण विभागामध्ये विनंती व प्रशासकीय बदल्यांचे प्रस्ताव तपासणीसंबंधी ४ थ्या शनिवारची सु˜ी असतानाही कामकाज सुरू होते. पण चोपडा, भडगाव आणि रावेर येथील गटशिक्षणाधिकारी (बीओ) आले नसल्याने हे प्रस्ताव मुख्यालयीन स्तरावर अंतिम करून तालुकास्तरावर गटसाधन केंद्रात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही मात्र होऊ शकणार नाही.
शनिवारी बदल्या व इतर मुद्द्यांबाबत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी आपल्या दालनात जिल्हाभरातील सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांची बैठक बोलावली.
प्रशासकीय व विनंती बदल्यांचे प्रस्ताव गटसाधन केंद्राकडून मागविले होते. ते प्राप्त झाले. या प्रस्तांबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांच्या उपस्थितीत शनिवारी काम करायचे होते.
सर्व तालुक्यांमधून माहिती प्राप्त झाली होती. प्रस्ताव तपासण्याची कार्यवाही सुरू झाली. परंतु चोपडा, भडगाव आणि रावेर येथील प्रस्तावांबाबत अंतिम कार्यवाही होऊ शकली नाही.
यामुळे नेमके किती प्रस्ताव विनंती व प्रशासकीय बदल्यांबाबत आले हेदेखील स्पष्ट झाले नाही. संबंधित गटशिक्षणाधिकारी या बैठकीला अनुपस्थित का राहीले याबाबत त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. या वृत्तास शिक्षणाधिकारी पाटील यांनी दुजोरा दिला.
या बदल्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर तपासून ते तालुकास्तरावर गटसाधन केंद्रात प्रसिद्ध करायचे आहेत. तेथे हरकती प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव अंतिम केले जातील.
शासन निर्देशांचे वाचन
अद्याप प्रशासकीय व विनंती बदल्यांबाबत नवीन आदेश शासनाने दिले नाहीत. त्यामुळे मागील शासनादेश लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्देशाचे वाचन गटशिक्षणाधिकार्‍यांसमोर करण्यात आले. पाच वर्षे एकाच तालुक्यात असलेल्या शिक्षकांची विनंती बदली तर १० वर्षे एकाच तालुक्यात असलेल्या शिक्षकांची प्रशासकीय बदली केली जाणार आहे.

आरटीईचे १६९८ अर्ज
आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी व इतर शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणानुसार मोफत प्रवेश देण्यासंबंधी येत्या २९ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. १ लीसाठी ३३०३ जागा असून, नर्सरीसाठी ४४२ जागा आहेत. या वर्गांसाठी आतापर्यंत १६९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक ९०७ अर्ज जळगाव शहरातील शाळांसाठी आले आहेत. जेवढ्या जागा आहेत तेवढे अर्ज न आल्यास ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ मिळू शकते. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आरटीई२५ॲडमिशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर हे अर्ज करायचे आहेत.

Web Title: Three officials working for the proposed change of proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.