कर्नाटकात रस्ते अपघातात तीन लहानग्यांसमवेत नऊ लोकांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 01:49 PM2017-09-13T13:49:04+5:302017-09-13T13:49:04+5:30
कर्नाटक पुन्हा एकदा भीषण अपघातानं हादरलं आहे. कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन लहानग्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या दोन्ही वाहनांचा अपघात एवढा जबरदस्त होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुले व तीन महिलांचा समावेश आहे.
बंगळुरू, दि. 13- कर्नाटक पुन्हा एकदा भीषण अपघातानं हादरलं आहे. कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन लहानग्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या दोन्ही वाहनांचा अपघात एवढा जबरदस्त होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुले व तीन महिलांचा समावेश आहे. कारवार तालुक्याजवळ झायलो गाडी आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातस्थळी पोलीस दाखल झाले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. झायलो गाडीतून माणसे येल्लापूरहून अनकोला जिल्ह्यात जात होते. त्याच वेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला गंभीररीत्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बागलकोटमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. बागलकोटमध्ये क्रूझर गाडी आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाल्याचं समजतं आहे. या अपघातात सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. तसंच इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेले सहा जणही सोलापुरातील दारफळ येथील आहेत. कर्नाटकामध्ये औषध घेण्यासाठी सोलापुरातील 12 जण गेले होते तेव्हा हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.
वैद्यकीय उपचारासाठी कर्नाटकात रुग्णाला घेऊन गेलेल्या माढा तालुक्यातील दारफळ येथील क्रूझर गाडीची बागलकोट तालुक्यातील बिळगी गावाजवळ शुक्रवारी सकाळी बसला धडक झाली. या भीषण अपघातात दारफळसह परिसरातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथील 12 जण गुरुवारी कर्नाटकात कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णाला घेऊन गेले होते. शुक्रवारी सकाळी रुग्णासह इतर 12 प्रवाशांना घेऊन निघालेल्या या क्रूझर आणि बसमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. यात चालकासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, उर्वरित सहा जण बचावले आहेत. घटनास्थळी तात्काळ वैद्यकीय तसंच पोलिसांचं पथक दाखल झालं. पण या अपघातातील जखमींची आणि मृत्यू झालेल्यांची नावं अजून समजलेली नाहीत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.