गुरांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन पकडले तिघे अटकेत : चिंचोलीजवळ औद्योगिक वसाहत पोलिसांची मध्यरात्री कारवाई
By Admin | Published: April 1, 2016 12:37 AM2016-04-01T00:37:28+5:302016-04-01T00:37:28+5:30
जळगाव : लहान वाहनात चार गुरांना कोंबून त्यांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन औद्योगिक वसाहत पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर चिंचोली (ता.जळगाव) गावाजवळ पकडले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज गाव : लहान वाहनात चार गुरांना कोंबून त्यांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन औद्योगिक वसाहत पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर चिंचोली (ता.जळगाव) गावाजवळ पकडले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांचे एक पथक बुधवारी रात्रीच्या सुमारास महामार्गावर औद्योगिक वसाहत, कुसंुबा, चिंचोली परिसरात रात्रीच्या गस्तीवर फिरत होते. मध्यरात्रीनंतर १२.३० ते दीड वाजेदरम्यान चिंचोली गावाजवळ या पथकाने (एमएच १९ बीएम १७७७) क्रमांकाचे चारचाकी वाहन अडवले. या वाहनात चार गुरे पुरेशी जागा नसताना कोंबण्यात आलेले होते. अशा स्थितीत त्यांची वाहतूक केली जात होती. म्हणून पोलिसांनी वाहनातील निदमअली मनुसअली, शेख शाहरूख शेख मोहंमद व शेख आमीन शेख फिरोज (तिघे रा.चोपडा) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुरांचे वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी पोलीस शिपाई भास्कर यशवंत ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायदा कलम ११ (१) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार नन्नवरे करीत आहेत.सखोल तपास होणारअटकेतील तिघे जण गुरांना घेऊन औरंगाबादकडे जात असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. ही गुरे चोरीची आहेत का, त्यांना विक्रीसाठी किंवा कत्तलीसाठी नेले जात होते का, याचा सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.