Coronavirus: शेतकऱ्यांनी केले लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 03:42 PM2021-06-01T15:42:04+5:302021-06-01T15:43:26+5:30
Coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
नवी दिल्ली: केंद्राच्या वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या ६ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी अजूनही अनेक शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, दिल्लीत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (three persons were arrested for violating lockdown norms near vayu bhawan delhi)
सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वायुसेना भवन जवळ दिल्ली पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन शेतकऱ्यांना अटक केली. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून तिघेही ओपन जिप्सीमध्ये जात होते. चौकशीनंतर लॉकडाऊनच्या उल्लंघनाच्या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतक शेतकऱ्यांना जामीनावर सोडण्यात आले.
सिंधू सीमेच्या दिशेने जात असल्याची माहिती
शेतकरी बंगला साहिब गुरुद्वारा येथे थांबले होते. त्यानंतर ते वायुसेनेच्या इमारतीजवळून जात होते. ते सिंधू सीमेच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी सांगितले. जेथे मागील सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना अडवून विविध कलमांतर्गत अटक केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा! ९७ टक्के कुटुंबांची कमाई घटली; १ कोटी रोजगार गेले
गेले दोन दिवस तिथेच थांबले होते
अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, मध्य दिल्लीतील बांगला साहिब गुरुद्वारा येथे प्रार्थना करण्यासाठी आले होते आणि गेले दोन दिवस तिथेच थांबले होते. आम्ही सिंधू सीमेच्या दिशेने जात होतो. परंतु, कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी ते जात नव्हते, असे सांगितले जात आहे. दरम्यान, वायुसेना भवन जवळील मार्गाने प्रवेश करणे हे एक मोठे दुर्लक्ष आहे. कारण संसद भवन वायुसेना भवनाच्या अगदी जवळ आहे. लॉकडाऊन कालावधीत शेतकरी येथे पोहोचणे ही मोठी चूक मानली जाते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर कारवाई केल्याचे समजते.