रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:42 PM2024-09-24T15:42:55+5:302024-09-24T15:45:16+5:30

भाजप खासदार कंगना राणौत यांनी मोठ्या विरोधानंतर केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे परत आणावेत, अशी मागणी केली आहे.

Three repealed agricultural laws should be brought back Kangana Ranaut is in high demand | रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी

रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला मोठा विरोध झाला होता. या विरोधानंतर हे कायदे मागे घेण्यात आले होते. दरम्यान, आता हेच तीन कायदे पुन्हा आणण्याची मागणी भाजपा खासदार कंगना राणौत यांनी केली आहे. हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते परत आणण्याची मागणी त्यांनी करायला हवी, असे कंगना रणौत यांनी सांगितले. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. 

कंगना राणौत यांनी सोमवारी मंडीच्या नाचन विधानसभेत कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी  माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही मागणी केली. त्यांच्या विधानावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली आहे. कंगना राणौत यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार

काँग्रेसने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. 'शेतकऱ्यांवर लादलेले तीन काळे कायदे परत आणले पाहिजेत. असे भाजप खासदार कंगना राणौत यांनी सांगितले. देशातील ७५० हून अधिक शेतकरी शहीद झाले, तेव्हाच मोदी सरकारला जाग आली आणि हे काळे कायदे मागे घेण्यात आले. आता भाजप खासदार पुन्हा हे कायदे मागे घेण्याचा विचार करत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खासदारांनी कितीही प्रयत्न केले तरी हे काळे कायदे परत येणार नाहीत',असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

खासदार कंगना राणौत काय म्हणाल्या?

खासदार कंगना राणौत माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या, 'शेतकऱ्यांबाबतचे जे कायदे मागे घेतले आहेत, ते पुन्हा लादले जावेत, असे मला वाटते. हे वादग्रस्त असू शकते, पण मला वाटते की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कायदे परत आले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वतःच त्याची मागणी केली पाहिजे. जेणेकरून इतर ठिकाणांप्रमाणे आमचे शेतकरी समृद्ध होत असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीला कुठेही खंड पडू नये. शेतकरी हा देशाच्या विकासातील प्रमुख शक्तीचा आधारस्तंभ आहे. काही राज्यांमध्ये ज्या तीन कायद्यांवर आक्षेप घेण्यात आला होता, त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ते कायदे स्विकारावेत, अशी विनंती मी त्यांना करू इच्छितो, असंही राणौत म्हणाल्या. 

Web Title: Three repealed agricultural laws should be brought back Kangana Ranaut is in high demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.