व्याघ्र प्रकल्पात तिघे दारू पीत बसले; तेवढ्यात वाघ एकाला जंगलात घेऊन गेला अन् फाडला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:13 PM2022-12-26T15:13:46+5:302022-12-26T15:14:09+5:30

जिम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये दारू पिणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले.

three sat drinking in the jim corbett national park; Then the tiger took one to the forest and killed | व्याघ्र प्रकल्पात तिघे दारू पीत बसले; तेवढ्यात वाघ एकाला जंगलात घेऊन गेला अन् फाडला...

व्याघ्र प्रकल्पात तिघे दारू पीत बसले; तेवढ्यात वाघ एकाला जंगलात घेऊन गेला अन् फाडला...

googlenewsNext

Uttarakhand News: उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हा परिसर सकाळ-संध्याकाळ सामान्य लोकांसाठी बंद असतो, पण शनिवारी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे तीन स्थानिक तरुणांना जीवावर बेतले. या भागातून जाणाऱ्या महामार्गावर बसून तिघेही दारू पीत होते. यादरम्यान, अचानक एक वाघ आला आणि तिघांवर हल्ला केला. 

एका तरुणाचा मृत्यू 
यावेळी दोघांनी वाघाच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवला, पण वाघ एका तरुणाला ओढत जंगलात घेऊन गेला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अब्दुल रशीद असे तरुणाचे नाव असून तो रामनगर येथील रहिवासी होता. रविवारी सकाळी त्याचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह जंगलात सापडला.

इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले
वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने या वाघिणीला पकडण्यासाठी कॅमेरे, पिंजरे आदी लावले आहेत. उत्तराखंड वन विभागाचे मुख्य वन्यजीव वॉर्डन समीर सिन्हा सांगतात की, प्रतिबंधित वनक्षेत्रात सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर हालचाली करण्यास पूर्णपणे बंदी असल्याचे स्पष्ट निर्देश आहेत. लोक त्याचे पालन करत नाहीत.

वाघाने किती लोक मारले 
सरकारी आकडेवारीनुसार, 2022 या वर्षात वाघांच्या हल्ल्यात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हा 2000 नंतरचा उच्चांक आहे. 17 डिसेंबरलाही वाघाने माजी सैनिकावर हल्ला करून त्याची हत्या केली होती. कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प आणि रामनगर वनविभागाच्या दरम्यान असलेल्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत.

Web Title: three sat drinking in the jim corbett national park; Then the tiger took one to the forest and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.