तीन राज्यांत भरघोस मतदान!

By admin | Published: May 17, 2016 04:34 AM2016-05-17T04:34:37+5:302016-05-17T04:34:37+5:30

तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित पुडुच्चेरीमध्ये सोमवारी कुठलीही अनुचित घटना न घडता भरघोस मतदानाची नोंद झाली.

Three states have huge voting! | तीन राज्यांत भरघोस मतदान!

तीन राज्यांत भरघोस मतदान!

Next


नवी दिल्ली/ चेन्नई/ तिरुवनंतपुरम : कडक उन्हासोबतच काही ठिकाणी मुसळधार पावसाने तडाखा दिला असताना तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित पुडुच्चेरीमध्ये सोमवारी कुठलीही अनुचित घटना न घडता भरघोस मतदानाची नोंद झाली. पुडुच्चेरीत विक्रमी ८१.९४ टक्के, तामिळनाडूत ६९.१९ तर केरळमध्ये ६५ टक्के मतदान नोंदले गेले. या तीन राज्यांमध्ये अनुक्रमे २३२, १४० आणि ३० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले.
तामिळनाडूच्या सालेम आणि नमाक्कल या मतदारसंघांमध्ये वेळ संपत असतानाही लांबच लांब रांगा आढळून आल्या. तंजावूर आणि दिंडीगुल येथे सकाळी पाऊस आल्यामुळे लोकांनी तेवढा काळ घरी राहणेच पसंत केले. वेदारांयम आणि नागापट्टीणम येथे मुसळधार पावसामुळे मतदानावर परिणाम झाला. द्रमुक आणि अण्णाद्रमुकसह प्रमुख राजकीय पक्षांनी या ठिकाणी मतदानाची वेळ वाढविण्याची केलेली मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केली नाही.
केरळमध्ये संध्याकाळपर्यंत अवघ्या ४४.९३ टक्के मतदानाची नोंद झाली. केंद्रशासित पुडुच्चेरीमध्ये सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. पुडुच्चेरीमध्ये आंध्र प्रदेशच्या यानम वस्त्यांचा तसेच माहे आणि कराईकालच्या काही भागाचा समावेश आहे. एकूण ९.४१ लाख मतदार असून, महिला मतदारांची संख्या ४.९४ लाख आहे. पुडुच्चेरीमध्येही पावसाचा मतदानावर परिणाम झाला नाही. तेथे एकूण ३० मतदारसंघांमध्ये ९६ अपक्षांसह एकूण ३४४ उमेदवार रिंगणात आहेत.
मोदींचे आवाहन...
तामिळनाडू, केरळ आणि पुडुच्चेरीच्या मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करीत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी टिष्ट्वटरवर केले. या तीनही राज्यांमध्ये भाजपाला अद्याप प्रभाव दाखवता आलेला नाही. या वेळी विशेषत: तामिळनाडू आणि केरळमध्ये
भाजपाने जोरदार प्रचार केला.
।तुरा पोटनिवडणुकीत ६६ टक्क्यांवर
मेघालयच्या तुरा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत
६६ टक्क्यांवर मतदान झाले. प्रतिकूल वातावरणातही मतदारांनी उत्साह दाखविला. सर्व ४९५ मतदान केंद्रांवर कोणतीही अनुचित घटना
घडली नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. या मतदारसंघाचे नऊवेळा खासदार राहिलेले माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए. संगमा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
चंडी, विजयन यांना विजयाचा विश्वास...
काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफ पुन्हा विजयी होईल, असा विश्वास केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी
यांनी तर या राज्यात डाव्या आघाडीची लाट असल्याचा दावा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार पिनारायी विजयन यांनी केला. विरोधी पक्षनेते व्ही.एस. अच्युतानंदन यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा अंदाज घेतला.
पोटनिवडणूकही शांततेत... गुजरातच्या सौराष्ट्रमधील गीर-सोमनाथ जिल्ह्यात तलाला विधानसभा मतदारसंघातील २३० मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. काँग्रेसचे आमदार जसू बारड यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक आवश्यक ठरली होती. झारखंडच्या पांकी व गोड्डा मतदारसंघांमध्ये
६५ टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली. बिदेशसिंग (पांकी) आणि रघुनंदन मंडल (गोड्डा) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली.
हृदयविकाराच्या
झटक्याने
चौघांचा मृत्यू
तामिळनाडूत तिघांचा तर केरळमध्ये एकाचा मतदानाच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. केरळच्या कोझिकोडेजवळील पेराम्ब्रा येथील एका मतदान केंद्रावर कुन्नी अब्दुल्ला हाजी (७०) रांगेत उभे असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या कांगेयाम विधानसभा मतदारसंघात
५४वर्षीय निवडणूक
अधिकारी तसेच मदुराई आणि शिवगंगा येथे दोन वृद्धांना हृदयविकाराचा धक्का बसला. वैद्यकीय उपचाराआधीच ते दगावले. या राज्यात कराईकुडी येथे मुसळधार पावसानंतर मतदान केंद्राचे छप्पर कोसळून पाच जण जखमी झाले.

Web Title: Three states have huge voting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.