सेल्फीच्या नादात कालव्यात पडून तीन विद्यार्थ्यांनी गमावला जीव
By admin | Published: February 13, 2016 12:05 PM2016-02-13T12:05:26+5:302016-02-13T12:05:26+5:30
मंड्या इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे तीन विद्यार्थी सेल्फी घेण्याच्या नादात कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुर, दि. १३ - मंड्या इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे तीन विद्यार्थी सेल्फी घेण्याच्या नादात कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत. काल, शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना बंगळूरपासून १८० किलोमीटरवर हुलीवना गावाजवळ घडली. दोघांचे मृतदेह सापडले असून तिस-याचा शोध सुरू आहे.
श्रुती व जीवन या बंगळूरच्या तर गिरीश या टुमकूरच्या विद्यार्थ्यांनी सेल्फीच्या नादात जीव गमावल्याचे पोलीस म्हणाले.
या तिघांसह गौतम पटेल व सिंधू असे एकूण पाच विद्यार्थी या गावातल्या कालव्याजवळ गेले होते. पाण्यामध्ये खेळत असताना ते सेल्फी काढत होते. या नादामध्ये त्यांचं बान राहिलं नाही आणि ते २० फूट खोली असलेल्या कालव्यात पडल्याचं पोलीसांनी सांगितलं. गौतमव सिंधूला वाचवण्यात स्थानिक लोकांना यश आलं, परंतु अन्य तिघांना ते वाचवू शकले नाहीत. हे सगळे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात होते. याआधी गुरुवारी या मुलांना स्थानिकांनी हटकलं होतं आणि नदीच्या या भागात खेळणं धोकादायक असल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यावेळी हे विद्यार्थी निघून गेले व शुक्रवारी पुन्हा आले. यावेळी मात्र त्या तीन मुलांच्या नशीबानं त्यांना साथ दिली नाही.