'भारत माता की जय' म्हणण्यास नकार देणा-या मदरशातील ३ विद्यार्थ्यांना जबर मारहाण
By admin | Published: March 30, 2016 09:20 AM2016-03-30T09:20:59+5:302016-03-30T09:23:14+5:30
भारत माता की जय घोषणा देण्यावरून सुरू झालेला राजकीय वाद अद्याप शमलेला नसतानाच अशी घोषणा देण्यास नकार देणा-या मदरशातील तीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना दिल्लीत घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - ' भारत माता की जय ' घोषणा देण्यावरून सुरू झालेला राजकीय वाद अद्याप शमलेला नसतानाच अशी घोषणा देण्यास नकार देणा-या मदरशातील तीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. या घटनेत १८ वर्षांचा मोहम्मद दिलकश या विद्यार्थ्याचा खांदा मोडला असून त्याचे इतर दोन मित्रही जबर जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे तिघेही बेगमपुरा येथील एका मदरशात शिक्षण घेत असून शनिवारी संध्याकाळी हा सर्व प्रकार घडला.
मोहम्मद दिलकशने दिलेल्या माहितीनुसार, मी व माझे दोन मित्र मदरशापासून सुमारे ३०० मीटर अंतरावरील एका पार्कमध्ये गेलो होतो. त्याचवेळी तिथे चार-पाच जणांचा एक ग्रुप आला आणि त्यांनी आम्हाला ' भारत माता की जय' अशी घोषणा देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी आम्हाला लाठ्यांनी जबर मारहाणही केली, असे दिलकशने सांगितले.
मंगळवारी संध्याकाळी या प्रकरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
We had gone to a park nearby, some men came & slapped one of my friends, asked him to say 'Jai Mata ki':Mohd Dilkash pic.twitter.com/HrbHX5WY4u
— ANI (@ANI_news) March 30, 2016
They said they would kill us if we don't say 'Jai Mata ki,'Jai Bharat'.But we didn't say:Mohd Dilkash pic.twitter.com/6sZRKUjdk8
— ANI (@ANI_news) March 30, 2016
We were not even given a chance to say anything. We then called up our teacher,he came & called up police-Mohd Ajmal pic.twitter.com/OQrqWy0ik6
— ANI (@ANI_news) March 30, 2016