शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्त्या

By Admin | Published: July 3, 2015 10:38 PM2015-07-03T22:38:16+5:302015-07-03T23:38:48+5:30

नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा, सातपूर परिसरात दोघांनी गळफास घेत तर आनंदवली येथील महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ पहिली घटना पाथर्डी फाट्यावरील दामोदरनगरच्या श्री आर्केड अपार्टमेंटमध्ये घडली़ या अपार्टमेंटमध्ये राहणारे योगेश यशवंत ठाकरे (वय ४०) यांनी गुरुवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Three suicides in different cities in the city | शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्त्या

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्त्या

googlenewsNext

नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा, सातपूर परिसरात दोघांनी गळफास घेत तर आनंदवली येथील महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ पहिली घटना पाथर्डी फाट्यावरील दामोदरनगरच्या श्री आर्केड अपार्टमेंटमध्ये घडली़ या अपार्टमेंटमध्ये राहणारे योगेश यशवंत ठाकरे (वय ४०) यांनी गुरुवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
दुसरी घटना सातपूर गावात घडली आहे़ योगेश बाबूराव जगताप (वय ३०) या युवकाने शुक्रवारी (दि़३) सकाळच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ या युवकाच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
तिसरी घटना आनंदवल्ली परिसरात घडली असून येथील एका महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली आहे़ या महिलेचे नाव कमलाबाई गोरख पवार (वय ४०) असे असून त्या आनंदवली पोलीस चौकीजवळ राहत होत्या़ कमलाबाई पवार यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three suicides in different cities in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.