आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक, हत्यारे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 09:07 PM2018-11-25T21:07:53+5:302018-11-25T21:08:11+5:30
दिल्ली पोलिसांना इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेच्या मॉड्युलचा दिल्ली पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
नवी दिल्ली/श्रीनगर - दिल्ली पोलिसांना इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेच्या मॉड्युलचा दिल्ली पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे ताहिर अहमद खान, हारिस मुश्ताक खान आणि आहिफ सुहेल खान अशी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. दिल्ली आणि श्रीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील कोठी बाग येथील टुरिझम रिसेप्शन सेंटरवर ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न केला होता. दिल्ली पोलिसांचे डीसीपी (स्पेशल सेल) पी. कुशवाहा यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. तसेच दहशतवाद्यांच्या अवंतीपुरा येथील गुप्त ठिकाणालाही उद्धस्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र हे दहशतवादी दिल्लीवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्याची योजना आखत होते याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाही.
Delhi Police Special Cell was working on J&K terror module. It conducted a joint op with Srinagar SOG y'day.3 terrorists nabbed,3 grenades&2 loaded pistol seized.Terrorists tried to lob greande at police party in Kothi Bagh’s Tourism Reception Center: DCP(special cell) P Kushwaha pic.twitter.com/BiEBwvUJy0
— ANI (@ANI) November 25, 2018