जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 04:37 PM2017-08-09T16:37:34+5:302017-08-09T17:04:57+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा बुधवारी करण्यात आला.
जम्मू-काश्मीर, दि. 8 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांकडून तीन दहशतवाद्यांचा बुधवारी खात्मा करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल सेक्टमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक झाली. यावेळी सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले असून अद्याप सर्च ऑपरेशन सुरुच ठेवले आहे.
{{{{twitter_post_id####
J&K Tral #UPDATE: Three terrorists killed in an encounter with security forces.
— ANI (@ANI) August 9, 2017
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार केलेले दहशतवाद्यांदी अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा विभागीय कमांडर झाकिर मुसा याच्या ग्रुपमधील होते. खात्मा करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे जाहिद आणि इसहाक अशी आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाने आपले जाळे काश्मीरमध्ये पसरवण्यासाठी घाजवट-उल-हिंद संघटनेची स्थापना केली. या संघटनेची जबाबदारी झाकिर मुसा याच्याकडे सोपविली आहे.
}}}}#Visuals from J&K: Three terrorists of Zakir Musa's Ansar Ghazwat ul-Hind killed in an encounter with security forces in Pulwama's Tral. pic.twitter.com/GAb0ggjp1q
— ANI (@ANI) August 9, 2017
सूत्रांच्या माहितीनुसार, चकमकीत ठार करण्यात आलेले दहशतवादी अल कायदाशी संबंधित असून, जाकिर मुसाच्या नेतृत्वात ते सक्रिय होते. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, जाहीद आणि इसहाक अशी त्यांची नावं आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदानं गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जम बसवण्यासाठी गजवा -ए- हिंद नावाची दहशतवादी संघटना स्थापन केली होती. तसेच मुसाला या भागाचं प्रमुख घोषित केलं होतं. सुरक्षा जवानांना त्रालमधल्या गुलाब बागमध्ये तीन दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्तरीत्या या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तीही पुलवामा जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्तानं येणार होत्या. मात्र ऐन वेळी त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. काश्मीरमध्ये सध्या लष्कराचं ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. त्यात त्यांनी दहशतवाद्यांची एक यादी बनवली आहे. यादीनुसार दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन राबवून त्यांना कंठस्नान घालण्यात येत आहे. आतापर्यंत 115 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.